Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत निंबा येथे पाटचारी कामाचे भूमिपूजन सरपंच वर्षाताई विजय पटले यांच्या हस्ते संपन्न........

देवेंद्र दमाहे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ( चित्रा न्युज महा.) मो. नं.8010710919


गोंदिया :- जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निंबा येथे आज दिनांक 27/ 5 /2023 रोज शनिवारला  महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत पाटचारी कामाचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली. या भूमिपूजन सोहळाचे अध्यक्ष माननीय रमेशजी पंधरे पंचायत समिती सदस्य , भूमिपूजक सरपंच वर्षाताई विजय पटले ,प्रामुख्याने उपस्थित उपसरपंच पि.आर. कटरे, ग्रामपंचायत सदस्य नंदलालजी उईके ,संजयजी शहारे , मालताताई भगत, संगीता कुंजाम, रोजगार सेवक हेमराज कोसरे, ग्रामविकास अधिकारी विलास सूर्यवंशी ,तांत्रिक अधिकारी विजय पटले ,संगणक परिचालक मंगेश जनबंधू   , ग्रामपंचायत कर्मचारी तसेच मजूर वर्ग उपस्थित होते. सदर  कामा विषयी तांत्रिक अधिकारी विजय  पटले यांनी कामाचे महत्त्व व शासन  निर्णयाप्रमाणे दर मजुरांना समजाऊन सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या