प्रतिनिधी चित्रा न्युज
भंडारा:-देशात सुरू असलेल्या लोकशाही व संविधान विरोधी केंद्र सरकारच्या विरोधात चुकीचे धोरण अवलंब करून देशाला योगदान देणाऱ्या राष्ट्रपुरुषांचा अपमान करून देशातील संसदीय लोकशाही व संविधान संपवू पाहणार्या प्रस्थापित प्रतिगामी व्यवस्थेच्या विरोधात, प्रति आंदोलन उभारण्यासाठी संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी तसेच देशात दलितांवर होणारे अत्याचार करणाऱ्याच्या विरोधात, ओबीसीची जातीय जनगणना न करणाऱ्याच्या विरोधात, जातीय मानसिकतेतून संसदेच्या उद्घाटनप्रसंगी दलित आदिवासीना बहिष्कार करणाराच्या विरोधात, नवीन संसद भवन मध्ये सम्राट अशोक यांच्या राजमुद्रा न ठेवता प्रस्थापितांच्या सिंगोल ठेवण्याच्या विरोधात, ओबीसी, दलित आदिवासीच्या आरक्षण संपवून खाजगीकरण करणाऱ्याच्या विरोधात, अशा अनेक लोकशाही विरोधी व संविधान चा अपमान करणाऱ्याच्या विरोधात, प्रति आंदोलन उभारण्यासाठी विविध समविचारी सामाजिक संघटना व राजकीय पक्षाची 16 जून 2023 रोज शुक्रवारला दुपारी 1:00 वाजता स्थळ विश्रामगृह भंडारा येथे बैठक चर्चा सत्राचे आयोजन केले आहे.या चर्चासत्र बैठकीमध्ये १) ओबीसी सेवा संघ, ओबीसी क्रांती मोर्चा, नॅशनल पीपल फेडरेशन आदिवासी संघटना, एकलव्य ढिवर संघटना, बिरसामुंडा बीग्रेड संघटना, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, प्रहार संघटना, काँग्रेस राष्ट्रवादी सेना भाजप मधील आंबेडकरवादी कार्यकर्ते, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट, आंबेडकरवादी पार्टी, रिपब्लिकन सेना, भीम आर्मी, भीमशक्ती संघटना, कास्ट्राईब संघटना, केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली, मानव अधिकार सेवा संघटना, सामाजिक न्याय संघटना, भारतीय बौद्ध महासभा, सम्राट अशोक सेना, समता सैनिक दल, भारत मुक्ती मोर्चा, बी आर एस पी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम, बुद्धिस्ट युथ फोर्स, भारत राष्ट्र समिती. वरील सर्व समविचारी सामाजिक संघटना व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता यांना निमंत्रित करण्यात आले करिता सर्वांनी बैठकीला न चुकता उपस्थित रहावे असे आवाहन मा. अचलभाऊ मेश्राम वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ता, मा. चंद्रशेखर टेंभुर्णे माजी सभापती समाज कल्याण भंडारा, मा. जयेंद्र गुलाब देशपांडे सामाजिक कार्यकर्ता यांनी केले आहे.


0 टिप्पण्या