Ticker

6/recent/ticker-posts

रस्ता चोरी थांबवलीच पाहिजे.



रस्ता चोरी थांबवलीच पाहिजे.

जळगाव शहरातील गांधी मार्केट समोरील रस्ता आमदार व मक्तेदाराने अर्धवट सोडून दिला आहे.पैसे मात्र पुर्ण रस्त्याचे घेणार.त्यातून आमदार, अभियंता, आयुक्त यांना कमीशन देणार.हे लोक स्वताच्या विकास करतात आणि जळगाव भकास करतात.असे अनेक ठिकाणी उघडकीस आणले आहे.
     जळगाव शहरातील रस्ते बनवतांना नागरिकांना जाणिवपूर्वक अंधारात ठेवले जाते.अज्ञानात ठेवले जाते.कुठेही टेक्निकल इन्फॉर्मेशन बोर्ड लावलेले नाही.हे काम करणे मक्तेदार आणि सा..बां.अभियंत्याचे आहे.यासाठी टेंडर मधे चार टक्के जास्त पैसा दिला जातो..महानगरपालिका आयुक्तांची आहे.ते नागरिकांकडून कर वसुली करतात.सर्धाधिक जबाबदारी तर आमदार भोळेंची आहे.ते निधी आणतात असे म्हणतात.तर मग,निधी खर्च करतांना कायदेशीर काम झाले पाहिजे.पण. आमदार जनतेशी प्रामाणिक नाहीतच.किंवा त्यांना ते ज्ञान नाही.
    जळगाव चे नागरिक कर भरतात.व्यापारी जीएसटी भरतात.हाच पैसा निधी म्हणून मिळतो.तो काही आमदाराच्या गाई ,म्हशी विकून मिळत नाही.तरीपण हे शेखी मारतात.नको ते बोर्ड लावतात.गीरीश भाऊंच्या सौजन्याने.गुलाबरावच्या मर्जीने.भोळे मामाच्या बुद्धीने.असे बोर्ड बेकायदेशीर असतात.
     एकतर कामे अर्धवट सोडून चोरी करतात.वरून शेखी मारतात.आता जळगाव च्या जनतेने जागृत झाले पाहिजे.लुटमार थांबत नसेल तर किमान चोरांना  निवडून तरी देऊ नये.
     आधी खडसे,नंतर महाजन आणि आता गुलाबराव .यांचे हातून जळगाव चे कल्याण होणार नाही.झाले नाही.तसा त्यांचा उद्देश नाहीच.पालकमंत्री बनल्यानंतर त्यांची आर्थिक पुंजी मात्र वाढलेली आहे.ती आमच्याच ताटातील वाटा चोरून.म्हणून आता जळगाव चे नागरिक सावध झाले आहेत.परगांवचा चोर नको आणि जळगावचाही चोर नको.जळगांवला उच्चशिक्षित, प्रामाणिक माणसे असतांना ही अशी कामचोर माणसे का निवडून द्यायची?

.... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या