भंडारा व गोंदिया मतदार संघ काँग्रेस पक्षासाठी सोडण्यात यावा अशी केली मागणी
भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो. नं.9373472847
दादर : आगामी लोकसभा निवडणूक २०२४ ची आढावा बैठक आज टिळक भवन, दादर येथे पार पडली. या बैठकीत भंडारा- गोंदिया मतदारसंघावर चर्चा करण्यात आली.हा मतदार संघ काँग्रेस पक्षासाठी सोडण्यात यावा,अशी मागणी भंडारा - गोंदिया जिल्ह्यातील सर्व नेतेमंडळी यांनी सामूहिकरीत्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले व सर्व समिती सदस्य यांच्याकडे करण्यात आली.
या आढावा बैठकीला भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, गोदिया जिल्हा अध्यक्ष दिलीप बंसोड,भंडारा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री बोरकर,भंडारा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन वंजारी व दोन्ही जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या