Ticker

6/recent/ticker-posts

*घोड्यावर बसून शाळेत टाकले पहिले पाऊल...*

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :-  आज दिनांक 15 जून 2023 रोजी जि. प .प्राथमिक शाळा- कवडगाव या ठिकाणी इयत्ता पहिलीतील दाखल पात्र 5  विद्यार्थ्यांची घोड्यावर बसून मोठ्या उत्साहामध्ये मिरवणूक काढण्यात आली. आज शाळेचा पहिला दिवस असल्याने इयत्ता पहिली मध्ये दाखल विद्यार्थी मोठ्या उत्साहाने शाळेत आले होते. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी तसेच विद्यार्थ्यांची शाळेची भीती कमी व्हावी या उद्देशाने शालेय व्यवस्थापन समितीच्या संमतीने तसेच शिक्षकांच्या स्वयंस्फुर्तीने मोठ्या उत्साहामध्ये पूर्ण गावभर इयत्ता पहिलीला दाखल पात्र विद्यार्थ्यांची मिरवणूक ढोल, ताशा लावून काढण्यात आली.
        या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री .दिपक राऊत त्याचबरोबर बाळासाहेब भोरे,संभाजी शेगडे, आण्णा भोरे, श्री. राहुल भोरे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब वाघ सर ,शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री .बबन यादव सर, अंगणवाडी सेविका श्रीमती. बांगरबाई ,सौ.शेगडेबाई,सौ. गटापबाई, त्याचबरोबर सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
    या कार्यक्रमाचे कौतुक जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री .बाळासाहेब धनवे साहेब,अरणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. रामदास गंभीरे साहेब यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या