🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२३ - ३ जून
शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत २०७९
भा. रा. १३ ज्येष्ठ १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : उत्तरायण
ऋतू : ग्रीष्म
मास : ज्येष्ठ
पक्ष : शुक्ल
तिथी : चतुर्दशी (११.१०) ~ पौर्णिमा
वार : शनिवार
नक्षत्र : विशाखा (०६.१०) ~ अनुराधा
राशी : वृश्चिक
*वट पौर्णिमा*
(पौर्णिमा प्रारंभ सकाळी ११.१०)
*जागतिक सायकल दिवस*
१८१८: मराठेशाहीचा अस्त – शेवटचे पेशवे बाजीराव हे मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम यांच्या स्वाधीन झाले. नंतर इंग्रजानी शनिवार वाड्या वर कब्जा केला आणि तिथे युनियन जॅक फडकला
१८३१: ‘भारतीय महिला विद्यापीठ’ या संस्थेची स्थापना. *१९२० मध्ये ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ’ (एस.एन.डी.टी.) असे नामांतर.*
१८८९: कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेने कॅनडाचे दोन्ही किनारे जोडले.
१९१५: इंग्रज सरकारने रवींद्रनाथ टागोर यांना नाईटहुड ही पदवी बहाल केली.
१९१६: महर्षी कर्वें यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.
१९४०: डंकर्कची लढाई – जर्मनीचा विजय. दोस्त सैन्याने पळ काढला.
१९४०: दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने पॅरिसवर बॉम्बवर्षाव केला.
१९५०: मॉरिस हेर्झॉग आणि लुईस लॅचेनल यांनी अन्नपूर्णा या ८,०९१ मीटर उंच असलेल्या शिखरावर प्रथमच यशस्वी चढाई केली.
१९६२: एर फ्रांसचे बोईंग ७०७ प्रकारचे विमान पॅरिसहून निघताना कोसळले. १३० ठार.
१९६३: नॉर्थवेस्ट एरलाइन्सचे डी.सी. ७ प्रकारचे विमान ब्रिटिश कोलंबियाच्या किनाऱ्याजवळ कोसळले. १०१ ठार.
१९६९: व्हियेतनामजवळ ऑस्ट्रेलियाची विमानवाहू नौका एच.एम.ए.एस. मेलबॉर्न व अमेरिकेची विनाशिका यु.एस.एस. फ्रँक ई. एव्हान्सची टक्कर. एव्हान्सचे दोन तुकडे झाले.
१९७३: सोवियेत संघाचेचे टी.यु. १४४ प्रकारचे विमान फ्रांसमध्ये गुसेनव्हिल जवळ कोसळले. १४ ठार.
१९७९: मेक्सिकोच्याअखातात इहटॉक या खनिज तेलाच्या विहिरीला आग लागली. ६,००,००० टन तेल समुद्रात पसरले.
१९८४: ऑपरेशन ब्ल्यू स्टार – भारतीय सैन्याने आत घुसलेल्या अतिरेक्यांना हुसकावण्यासाठी अमृतसरच्या सुवर्णमंदिरावर कारवाई केली.
१९८५: भारत सरकारने पाच दिवसांच्या कार्यदिवस आठवड्याला सुरुवात केली.
१९८९: थ्येनआनमन चौकात सात आठवडे तळ ठोकलेल्या प्रदर्शकांना घालवण्यासाठी चीनने लष्कर पाठवले.
१९९१: जपानमधील माउंट उंझेन ज्वालामुखीचा उद्रेक. ४३ पत्रकार व संशोधकांचा मृत्यू.
१९९८: जर्मनीमध्ये आय.सी.ई रेल्वेगाडी रुळांवरुन घसरली. १०१ ठार.
१९९८: जमिनीवरील हवेतील लक्ष्यावर मारा करणाऱया त्रिशूल क्षेपणास्त्राची कोचीजवळील द्रोणाचार्य (G.S.) येथून यशस्वी चाचणी झाली.
जन्मदिवस
१८९०: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक बाबूराव पेंटर
१८९०: खान अब्दुल गफार खान तथा सरहद गांधी
१८९२: लेखिका तसेच बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के
१८९५: चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत के.एम. पण्णीकर
१९२४: तामिळनाडूचे १५ वे मुख्यमंत्री एम. करुणानिधी
१९३०: भारतीय पत्रकार, कामगार नेते आणि केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस
मृत्यूदिन
१९३२: उद्योगपती सर दोराबजी टाटा
१९५६: स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तानचे संपादक, लेखक व नाटककार वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी
१९९७: चित्रपट व नाट्य अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर
२०१०: मराठी चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक अजय सरपोतदार
२०१४: केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन.
२०१६: अमेरिकन बॉक्सर मुहम्मद अली
*|| दास-वाणी ||*
जे मिथ्या म्हणतांच गोवी ।
माईकपणें लाघवी ।
वक्तयास वेढा लावी ।
वेगळेपणें ।।
वंदू ऐसी वेदमाता ।
आदिपुरूषाची जे सत्ता ।
आता आठवीन समर्था ।
सद्गुरूसी ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०७/०१/०८-११
ही जी शारदा आहे तिला मिथ्या किंवा मायिक अाहे असे म्हणताच आपल्या सामर्थ्याने वक्त्याला झपाटून टाकते. ब्रह्मवस्तूचे वर्णन करताना ती त्याला ब्रह्मापासून वेगळे करते. अद्वैतापासून द्वैतामधे आणते. परब्रह्माचे वर्णन करण्यासाठी निरूपणकाराला त्याच्यापासून आधी दूर जावे लागते. हेच द्वैत होय.
वेद शब्दांतून प्रगट होतात. शब्द हे मायेच्या अधिपत्यात येतात. म्हणून शारदामाया वेदांची जननी. या वेदमातेला आपण वंदन करू. त्यानंतर मायेचा निरास करू शकणाऱ्या समर्थ सद्गुरूंनाही वंदन करू, ज्यांच्या कृपेने मायेचा उलगडा होऊन साधकाला पुन्हा ब्रह्मपदी आरूढ होता येते.
मंगलाचरण समास.
🙏 💐 💐 💐 💐 💐 🙏


0 टिप्पण्या