Ticker

6/recent/ticker-posts

मनोहर भिडेचा सिडको येथील कार्यक्रम रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256


नांदेड - 14 जुलै रोजी सिडकोच्या परिसरात नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून दोन धर्मामध्ये वाद निर्माण करणार मनोहर भिडेचा सिडको येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याचा कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी वंचितच्यावतीने ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांना निवेदन देऊन मागणी केली. निवेदनात त्यांनी आतापर्यंत केलेल्या विधाने हे देशद्रोही. राष्ट्रदोही केली आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडत आहे. नांदेड मध्ये सर्व समाजात सलोख्याचे संबंध आसून सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने राहतात. अशा परिस्थतीत जर मनोहर भिडे हे भडकाऊ वक्तव्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही .व महाराष्ट्रात आनेक ठिकाणी त्यांच्या अश्या वक्तव्यामुळे वादंग निर्माण झाली आहेत. त्यामुळे दि. 14/07/ 2023 चा मनोहर भिडेचा कार्यक्रम रद्द करून शहरातील कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवावे हि प्रशासनाला विनंती आहे. जर भविष्यात या बाबतीत काही अप्रीय घटना घडल्यास त्याला प्रशासन सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील अशी सूचना वंचितच्या वतीने देण्यात आली. यावेळी नांदेड दक्षिणचे महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, सुरेश गजभारे, अशोक मगरे अमृत नरंगलकर, साहेबराव भंडारे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या