रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515
नाशिक - नाशिकपूर्व भागातील मालेगाव तालुक्यात असंख्य युवकांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर व कार्यावर विश्वास ठेवत, पक्षाचा जयघोष करत पक्ष प्रवेश केला.
सायने येथील सामाजिक कार्यकर्ते किरण नानाजी मगरे यांनी यासाठी पुढाकार घेवून तालुक्यातील त्यांच्या समर्थकांसह भव्य बाईक रॅली काढून,शक्ती प्रदर्शन करत वंचित बहुजन आघाडी संपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष कपिल आहिरे यांच्या हस्ते शाल सत्कार होऊन प्रवेश केला.
राकेश गौतम आहिरे, दीपक साहेबराव मगरे, समाधान दिलीप मोरे,माणके,आकाश साहेबराव निकम, संतोष गायकवाड यांच्यासह शेकडो युवकांनी पक्ष प्रवेश केला.
जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ आहिरे यांनी, युवकांनी राजकारणात येवून समाजहिताचे कार्य करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी उत्तम पर्याय असून कार्यकर्त्यांनी परिश्रमाने पक्षात कार्य केल्यास नक्कीच मालेगांव तालुक्यात नवीन इतिहास घडेल, असे आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रतिपादन करत पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे शुभेच्छा देत अभिनंदन केले. जिल्हा प्रवक्ते यशवंत निकम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.जिल्हा महासचिव संजय जगताप यांनी आभारप्रदर्शन केले.
यावेळी सहसचिव राजू धिवरे, मुकेश खैरनार, सुनील आहीरे,शशिकांत पवार, सिद्धार्थ उशीरे, संदीप महिरे, संतोष आहिरे, विनोद जगताप, कादिर शेख, संतोष बोराळे,अमोल निकम,सलीम शेख तसेच सायने,दसाने,लोणवाडे, आघार,माणके,चंदनपुरी या गावातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या