Ticker

6/recent/ticker-posts

अवैधरित्या चालू असलेल्या कलाकेंद्राचा 15 दिवसाच्या आत परवाणे रद्द करावे अन्यथा उपोषणास बसणार :- दिगंबर उत्तमराव आजबे...जामखेड कलाकेंद्र हे गुन्हेगाराचा अड्डा...

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :- जामखेड तालुका हद्दीतील 1.लक्ष्मी कला केंद्र 2. जगदंबा कला केंद्र 3. झंकार कला केंद्र या ठिकाणी अवैधरीत्या वेश्याव्यवसाय चालू असून जामखेड शहरांमध्ये इतर तालुक्यातील तडीपार व फरार आरोपी रात्री अपरात्री येत असून ते या कला केंद्रावर मध्यप्राशन करून जामखेड शहरांमध्ये चार चाकी गाड्या फिरवतात. व दहशत निर्माण करतात. त्यामुळे जामखेड तालुक्याची कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून जामखेड शहरांमध्ये पूर्णपणे अशांतता पसरली आहे. संबंधित कला केंद्रास हप्ते घेऊन जामखेड पोलिस स्टेशनचा वरदहस्त आहे. संबंधित कला केंद्र गुन्हेगारांचा अड्डा बनला असून परवान्याच्या नियमांचा भंग करून पहाटे 4, 5  वाजेपर्यंत संबंधित कला केंद्र चालू असतात.
 सदर कला केंद्र विषयी लेखी तक्रार करून सुद्धा प्रशासनाने दखल घेतली नाही. तरी आज पासून 15 दिवसाच्या आत काही एक न एकता संबंधित कला केंद्र परवाने रद्द करण्यात यावेत.  अन्यथा कारवाई न झाल्यास मी माझ्या सहकार्यासोबत अमरण उपोषणास बसणार आहे. माझ्या व सहकाऱ्यांच्या जिवितास काही एक हानी झाल्यास पूर्णपणे या सर्व प्रकरणाची जबाबदारी संबंधित कला केंद्र मालक व जामखेड पोलीस स्टेशनची राहील.
सदर निवेदनावर सचिन आजबे,सतिश राजगुरू, किशोर कांबळे, चंद्रकांत राऊत दत्तात्रय आजबे, दत्तात्रय साळुंके, अशोक उगले, सय्यद इब्राहिम, महामुनी रामभाऊ, पांडुरंग जाधव, सचिन जाधव, राजेंद्र सावता, तुकाराम राऊत, गोविंद निकम, मारुती समुद्र, कुसुम खाडे, रामदास खाडे, सुनीता आजबे, कृष्णा आजबे, सुवर्णा आजबे, प्रमोद शेटे, सागर शेटे, योगेश कुलथे, अंजली डोबे, ज्योती शेटे, प्रियंका शेटे, मानवी शेटे, बशीर सय्यद, प्रतीक पाखरे समीर शेख.यांच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या