Ticker

6/recent/ticker-posts

वर्धा शहरातील इंदिरानगरात दोन गटात हाणामारी झाल्याने ११ जणांना अटक

रामनगर पोलिसांची धडक कारवाई

भवन लिल्हारे कार्यकारी संपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847

वर्धा : सविस्तर असे की, घरासमोर सुरू असलेल्या बांधकामाच्या कारणातून झालेल्या वादात दोन गट आमने-सामने येऊन शिवीगाळ झाली. त्यानंतर दोन्ही गटांतील सदस्यांत तुंबळ हाणामारी झाली. ही घटना शहरातील इंदिरानगर परिसरात घडली. याप्रकरणी २ रोजी रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन्ही गटांतील ११ जणांना अटक केल्याची माहिती दिली.
रोशन चंद्रमणी नाईक याने दिलेल्या तक्रारीनुसार, तो त्याचे वडील रात्रीच्या सुमारास घरी असताना पंचफुला व तिची दोन मुले घराच्या समोरील विटा-सिमेंटने भिंतीचे बांधकाम करीत होते. त्यांना बांधकाम करण्यास मनाई केली असता पंचफुला भोयर, शोभा कुमरे व निखील भोयर यांनी वाद करून शिवीगाळ केली. निखील भाेयर याने फावड्याच्या दांड्याने मारहाण केली. तसेच त्याचे वडील, भावासह इतरांनाही मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी निखील भोयर, आकाश भोयर, प्रकाश कुंबरे, पंचफुला भोयर, शोभा कुंबरे यांना अटक केली.
तर निखील भोयर याने दिलेल्या तक्रारीनुसार तो व त्याचा भाऊ आकाश भोयर हे संरक्षण भिंतीचे बांधकाम करीत असताना रोशन चंद्रमणी नाईक, राहुल नाईक, चंद्रमणी नाईक, प्रसन्नजित सुंदरदास भगत, सुंदरदास भगत, सुकेशनी नाईक यांनी काठीने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी सर्वांना अटक केल्याची माहिती दिली. दोन्ही घटनेतील तब्बल ११ आरोपींना अटक केली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या