Ticker

6/recent/ticker-posts

सभ्य माणसांची मांदियाळी!

सभ्य माणसांची मांदियाळी!

     जळगाव शहरातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व श्रीमान दिलीप तिवारी यांनी अबतक छप्पन्न गाठले.ते सेंच्युरी गाठतील,अशी आम्ही शुभेच्छा दिली.
     श्री तिवारी यांना आम्ही पत्रकार या जमातीच्या माध्यमातून जरी ओळखत असलो तरीही ते सामाजिक भान असलेले बुद्धीमान व्यक्ती आहेत.व्यवसाय म्हणून पत्रकार बनले पण ते त्या व्यतिरिक्त आम्हाला जाणवले.पत्रकारितेच्या दलदल मधे फसून न राहाता त्यांनी राजकीय क्षेत्रात योगदान द्यावे.अशी त्यांना विनंती केली.पण ते म्हणाले की, जळगाव मधे ज्याचा अवैध व्यवसाय असेल म्हणजे दारु,गांजा,अफू,गुटखा, सट्टा,रेती,राशन,सावकारी,शिरजोरी, हाणामारी, बलात्कारी अशाच लोकांना संधी मिळते.कारण जो पैसा फेकतो त्याचीच बातमी दिली जाते.डाकूला साधू रंगविण्याचा धंदा पत्रकार या धंद्यात होतो.जळगांव शहरातील नगरसेवक आणि जिल्ह्यातील आमदार खासदार चे चारित्र्य पाहाता येते गुज्जर ,माधवसिंग,फुलनदेवी सुद्धा अपयशी ठरली असती.आणि अशीच माणसे येथे निवडून येतात.अर्थात ती राजकीय नसतातच.राजकारण करीतच नाहीत.ते करतात राजकारणाचा धंदा.ते मला अवगत नाही.शिवाय आमदार खासदार मंत्री कडे गुंडांची मोठी टोळी असते.हरामाची कमाई म्हणून पदरी ठेवतात कसाई.ते मला जमणार नाही.
     काल परवाच पाचोरा येथे आमदारांनी एका पत्रकाराला शक्य तितक्या खोलात जाऊन , बोअरवेलमध्ये उतरून  शिवीगाळ केली.खूप मोठे धाडस केले.कारण ते आमदार महाशय  एकनाथ शिंदे साठी काम करतात.जे आनंद दिघेंचे अनुयायी आहेत.तर मग,हे होणारच.येथे पत्रकार फेल ठरला.अपयशी ठरला.अपमानित झाला आणि ठोकला ही गेला.हे पत्रकारिता धंद्यातील मोठे अपयश आहे.हा पत्रकारांच्या धंद्याचा परिणाम आहे.याची मुळ कारणे पत्रकारिता धंद्यात आहेत.पत्रकार नेहमीच बलवंतांची बाजू उचलून धरतात.बलवंतांचे दुर्गुण झाकण्यासाठी सगुणांचा छिडकावा करतात.मळाची दुर्गंधी लपवण्यासाठी अत्तर शिंपडणे.पण अत्तर मारून मळ निघत नाही.उलट घट्ट होऊन अंगाला फिट्ट बसतो.पत्रकार  कमजोर माणसाची बारीक उणिवा शोधतात.पार बदनाम करून बरबाद करतात.यामुळे राजकीय क्षेत्रात गुंड गुन्हेगार बलात्कारींचा सुळसुळाट वाढलेला आहे.त्याचे हे पाप माप भरून ओसंडून वाहात आहे.
     जळगाव महापालिकेत जर कोणी शिरले आणि धाडस करून काही बोलले तर तो जिवंत परत येणारच नाही.इतके भयानक नगरसेवक तेथे जमलेले आहेत.मी एकदा असाच महासभा चालत असताना आंत जाऊन बसलो तर मला ताबडतोब पाकिस्तानी नागरिक समजून बाहेर काढले.पण गिरीश महाजन यांचे पीए तेथे जाऊन बसले तर डोनाल्ड ट्रम,बायडन इतकाच त्यांचा मान राखला गेला.अशी ही महानगरपालिका महासभा.
     या महासभेला लोकशाही, राजकीय,नगरहितसंवर्धक बनवण्याची आमची तयारी आहे.त्यासाठी जळगाव मधील  सभ्य, बुद्धीमान, उच्चशिक्षित, ज्ञानी ,नितीमान,प्रामाणिक नागरिकांचा शोध घेत आहोत.त्यांना नगरसेवक निवडून आणण्यासाठी सभ्य, बुद्धिमान, उच्चशिक्षित, ज्ञानी ,नीतिमान , प्रामाणिक नागरिकांना आवाहन करीत आहोत.त्यात तुमची भर पडावी.जेणेकरून गुंड सभेचे,चोरसभेचे रूपांतर सभ्यसभेत करणार आहोत.या महासभेच्या नेत्याला महापौर म्हणणे सार्थकी ठरेल.आमच्या कराचा पैसा आमचे रस्ते गटारी सफाई, आरोग्य शिक्षण वगैरे सोयीसुविधा साठी वापरता येईल.
     जळगाव शहरातील जनतेला जर अशा सोयीसुविधा हव्या  असतील आणि आपली बायको पोरं शाबूत राखायची असतील तर त्यांनी जळगाव जागृत जनमंच सोबत येऊन आपल्या सभ्यतेची चुणूक दाखवावी.
     हा तुमच्या जातीचा होता.तर मग दिली संधी.नवरा ,बायको,आई,बाप सुद्धा .काय परिणाम झाला?गड्डे आणि खड्डे.हा आमच्या जातीचा होता.दिली संधी.नवरा, बायको, साला, पाव्हणा सुद्धा.काय परिणाम झाला?गड्डे आणि खड्डे.याच हरामखोरांना शहरातील ३९७ओपन स्पेस बळकावून धंदे सुरू केलेत.आत महासभेत  शिरल्यावर कळेल ,मग कळवतो तुम्हाला यांनी आणखी काय काय धंदे केलेत? पण यासाठी मतदारांनी मत विकू नये.पांचशे हजार ची घस, तूट सोसून घ्यावी.पण करोडोंचे रस्ते बनले तर अनमोल असे प्राण वाचवू शकतो.यासाठी चाकू सुरी पिस्तूल काठी लाठी दगड ची गरज नाही.फक्त मन बनवले पाहिजे की,आता मत विकायचे नाही.आता गुंडांना मत देणार नाही.आता चोरांना मत देणार नाही.
    मला वाटते हे सहज शक्य आहे.तशी तजवीज निवडणुकीत बुथवर केलेली असते.गुप्त मतदान!
     आत्ताच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पक्षांनी बुथ कॅप्चरींग ची फिल्डींग लावलेली आहे.यासाठी गुंडांची फौज तयार ठेवलेली आहे.पैशांची तरतूद करून ठेवलेली आहे.आणि आपण, जळगाव जागृत जनमंचने बिन पैशांची,सभ्य लोकांची निवडणुक लढवणार आहोत.म्हणूनच सभ्य व प्रामाणिक लोकांना सोबत येण्याचे आवाहन करीत आहोत.
    संदिप महाजन यांचा ताजा अनुभव लक्षात घेता, पत्रकार बांधवांनी आता तरी आपले धोरण बदलले पाहिजे.पैसे मिळाले तरीही खोटी बातमी ,खोटी स्तुती करू नये.

... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या