कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
मो.9545914324
भंडारा :-लाखनी येथील नगरपंचायतचे उपाध्यक्ष प्रदीप तितीरमारे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज शुक्रवारी(ता.११) ला घेण्यात आली. उपाध्यक्ष पदाकरीता भाजपा च्या नगर सेवक लता रोडे यांचा एकमेव नामांकन आल्यामुळे पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी गौरव इंगोले यांनी अविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
नगर पंचायत लाखनी ची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०२२ मध्ये पार पडली. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ची युती होऊन राष्ट्रवादी च्या त्रिवेणी पोहरकर यांची नगराध्यक्ष पदी तर काँग्रेस चे प्रदीप तीतिरमारे यांची उपनगराध्यक्ष पदी निवड करण्यात आली. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊन राष्ट्रवादी चा एक गट अजित पवार यांचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस चे बाहेर पडून भाजपा शिंदे गटासोबत सत्तेत सहभागी झाल्याने राज्याचे राजकारण ढवळून निघाले. त्याचा परिणाम लाखनी नगर पंचायतवरही झाला. राष्ट्रवादी व भाजपा च्या नगर सेवकांनी उपाध्यक्षावर अविश्वास आणला होता. उपनगराध्यक्ष प्रदीप तीतिरमारे यांनी अविश्वासाची विशेष सभा येण्यापूर्वी च राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर शुक्रवार(ता.११) रोजी नगर पंचायत सभागृहात उपनगराध्यक्षा करिता निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. नगर सेवक लता रोडे यांचा एकमेव अर्ज आल्याने उपाध्यक्ष पदी त्यांची अविरोध झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी गौरव इंगोले यांनी जाहीर केले. निवडणूक प्रक्रियेत नगर पंचायतीचे मुख्याधीकारी सतीश चौधरी यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष लता रोडे यांचे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवराम गिरेपुंजे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तथा वाजत गाजत विजयी मिरवणूक काढण्यात आली.


0 टिप्पण्या