Ticker

6/recent/ticker-posts

बिडगाव येथे वंचित बहुजन आघाडीचा जन आक्रोश मोर्चा

रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515

नागपूर - २ऑगस्ट रोजी बीडगाव शाखा अध्यक्ष नयन जामगडे यांच्या नेतृत्वात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे नागपूर जिल्हा, नागपूर शहर , कामठी तालुका , बिडगाव शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बीडगाव गट ग्रामपंचायतचे स्थानिक रहिवासी नागरिक यांचे उपस्थितीत मोठ्या संख्येने गावातील नागरिकांच्या विविध समस्या घेऊन जसे उर्वरित रस्ते, नळ पाईपलाईन, वीज पुरवठा, स्मशान घाट निर्माण ,संविधान भवन, आरोग्य सेवा केंद्र ( दवाखाना) सीसीटीव्ही कॅमेरे, स्ट्रीट लाईट. इत्यादी जनसामान्यांच्या समस्या घेऊन वंचित बहुजन आघाडी शाखा बीडगावच्यावतीने गट ग्रामपंचायत बिडगाव येथे मोठ्या संख्येने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

 याप्रसंगी विदर्भ पूर्व संयोजक भगवान भाऊ भोंडे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विश्रांती ताई रामटेके, नागपूर शहर अध्यक्ष रवी भाऊ शेंडे, जिल्हा महासचिव प्रशांत नगरकर जिल्हा उपाध्यक्ष नरेश वाघमारे, कामठी मौदा विधानसभा प्रमुख सी,सी,वासे, कामठी तालुका संघटक राजेश ढोके , कामठी तालुका महासचिव प्रशांत वाघमारे, कामठी तालुका प्रवक्ता जगदीश रंगारी, शहर उपाध्यक्ष अशोक वाघमारे, शहर महासचिव वैशाली वाघमारे, ज्येष्ठ नेत्या वनमाला ताई उके, पूर्व नागपूर अध्यक्ष गणेश हरकंडे , पूर्व नागपूर युवक आघाडी अध्यक्ष इरफान भाई पठाण, माजी शहराध्यक्ष विनोद भाऊ गजभिये,बीडगाव शाखा महिला आघाडी संघटिका शालू ताई साहारे , बीडगाव शाखा महिला आघाडी महासचिव रिता ताई जामगडे , नागपूर शहर महासचिव धम्मदीप लोखंडे, रवी वानखेडे , बीडगाव शाखा कार्यकर्ता सलमान भाई पठाण, शाखा महासचिव निखिल भांगे, बिडगाव शाखा उपाध्यक्ष विक्की गजभिये, बीडगाव शाखा प्रवक्ता सदानंद शेंडे , धम्मा बोरकर , अक्षय लोखंडे, गंगाराम खेडकर , रामचंद्र दुदुके, रितिक गजभिये, विशाल मेश्राम, रजत जामगडे, रोशनी गजभिये आशाबाई जामगडे ,रागिनी ढोके ,प्रिया जामगडे, पल्लवी शेंडे इत्यादी गावातील नागरिक मोठ्या संख्येने आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मोर्चाची सुरुवात चेरी कंपनी पासून करण्यात आली. 

गट ग्रामपंचायत बिडगाव या ठिकाणी जाऊन वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरपंच यांचे कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले याप्रसंगी गट ग्रामपंचायतचे सरपंच श्रीमान निकेश कातुरे अनुपस्थित होते. त्यामुळे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व उपसरपंच श्री संतोष तिजारे यांच्याशी विविध मागण्यांविषयी व समस्यांविषयी संवाद साधून त्यांना निवेदन देण्यात आले. व त्यांनी सर्व नागरिकांचे उपस्थितीत राहुन मागण्या पूर्ण करण्याबाबत आश्वासन दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या