माझी माती माझ्या देश अंतर्गत जि.प. उच्च प्राथमिक शाळेत विभिन्न कार्यक्रम
हर घर झेंडा अभियानाला मांडेसर वासीयांचा प्रतिसाद
गुणवंत विद्यार्थिनी कु. धनलक्ष्मी बोरकर यांच्या हस्ते १५ ऑगस्टला ७६ वा वर्धापन दिनी ध्वजारोहन
भवन लिल्हारे कार्य. संपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847
भंडारा : भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील मौजा मांडेसर येथे गट ग्रामपंचायत च्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत शासनाच्या विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून "हर घर झेंडा हर घर तिरंगा "उपक्रम "मेरी मिट्टी मेरा देश " स्वाभिमान अभियान घेऊन जे सैनिक स्वतःचा जीव धोक्यात घालून देशाची रक्षा करतात व प्रसंगी आपत्तीच्या काळात देश वासियांना सुरक्षा व जीवदान देण्याच्या कार्यात सुद्धा हातभार लावतात अशी देश सेवा करणारा सैनिकांचे आदर्श डोळ्यापुढे ठेवून मांडेसर गट ग्रामपंचायत सरपंच मा. गुलाब सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनात सैनिकांचा सह पत्नीक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. व स्वाभिमानी " मेरी मिट्टी मेरा देश " फलक लावण्यात आले.
सत्कार समारंभाचा कार्यक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मांडेसर च्या पटांगणावर करण्यात आले. सत्कार समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. भवन लिल्हारे ( अध्यक्ष शा. व्य. समिती ) हे होते. माजी सैनिक सूर्यकिरण सव्वालाखे यांनी ध्वज पूजन करून कु. धनलक्ष्मी बोरकर यांचे हस्ते जि.प. शाळेचे ध्वजारोहण करण्यात आले. कु.धनलक्ष्मी दुर्योधन बोरकर ह्या मुलीने दहाव्या वर्गात ८०% टक्के गुण प्राप्त करून गावात प्रथम स्थान मिळवले होते. मांडेसर गावात सुरू असलेली परंपरा टिकवून राहावी. व गट ग्रामपंचायत असलेल्या मांडेसर गावात जो कोणी विद्यार्थी विद्यार्थिनी गावात १० वी मध्ये अव्वल क्रमांकाचे टक्केवारी घेऊन पास होईल. त्याच विद्यार्थ्यांच्या हस्ते १५ ऑगस्ट या दिवशी ध्वजारोहण केला जाईल. व १२ वी मध्ये जो कोणी विदयार्थी ,विद्यार्थीनी गावात प्रथम स्थान पटकवेल अशा विद्यार्थ्यांच्या हस्ते २६ जानेवारी या दिवशी ध्वजारोहण करण्यात येईल. अशी चालत असलेली परंपरा टिकून राहावी म्हणून शाळा व्य. समिती अध्यक्ष मा. भवन लिल्हारे व मुख्याध्यापक मा. नरेंद्रजी उरकुडे यांनी चालत असलेली परंपरा टिकवून ठेवली.
माजी सैनिक सह पत्नीक मा. सुर्यकिरण सव्वालाखे (माझी आर्मी कमांडो ) व प्रत्नीक सौ. तनुजा सव्वालाखे यांचे सत्कार सन्मान गट ग्राम पंचायतीचे सरपंच मा. गुलाब सव्वालाखे, उपसरपंच मा.रोशन लिल्हारे , पोलीस पाटील मा. दिलीप सव्वालाखे, अध्यक्ष मा. भवन लिल्हारे , मुख्याध्यापक मा. नरेंन्दरजी उरकुडे, श्रीमती धुरपताबाई लिल्हारे, मा.दुर्योधन बोरकर ग्रा.प. सदस्य , शाळा व्य. समिती , शासकिय आरोग्य विभाग कर्मचारी , तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, शिक्षक , विद्यार्थी , विद्यार्थिनी व गावकरी यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
* *माझी माती माझा देश अंतर्गत विभिन्न कार्यक्रम**
जिल्हा परिषद शाळे तर्फे माझी "माती माझा देश " या कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने दिनांक १३ , १४ , १५ ऑगस्ट ला गट ग्रामपंचायत व जि.प. उच्च प्राथमिक शाळा एकजूट होऊन संपूर्ण मांडेसर गावात विविध कार्यक्रम घेतले. वृक्षारोपण करणे, महिला सशक्तिकरण, निपूण भारत अंतर्गत माता पालकांचा सत्कार , चित्रकला स्पर्धा , रांगोळी स्पर्धा , गित गायन स्पर्धा, डॉन्स स्पर्धा, भाषण स्पर्धा , शाळकरी मुलांना गणवेश वाटप , अशा विविध स्पर्धा जि.प. उच्च प्राथमिक शाळेत घेण्यात आली.
*हर घर झेंडा अभियानाला गावकऱ्यांच्या प्रतिसाद*
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वावर सध्या १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत भारतीय नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावण्याची अनुमती देण्यात आली आहे. हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत गावागावात व शहरात व जिल्ह्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने तिरंगा घरावर दिमाखाने उभारला आहे. स्वातंत्र्याची स्मृति तेवत राहावी. जनतेच्या मनातील स्वातंत्र्याच्या स्मृती तेवत राहाव्यात स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारक , स्वातंत्र्यसंग्रामात घडलेल्या विविध घटना , यांचे स्मरण व्हावे. देशभक्तीची जागृत भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, दैदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्याचे उद्देशाने हर घर झेंडा हा उपक्रम मौजा मांडेसर येथे १५ ऑगस्ट पर्यंत राबविण्यात आले. या उपक्रमा अंतर्गत सर्व शासकीय कार्यालये,ग्रामपंचायत,शाळांमध्ये तिरंगा ध्वज लावण्यात आले. घरी व कार्यालयात ध्वज उभारताना सावधगिरीने काळजी घेण्यात आली. यामध्ये ध्वजाच्या जमिनीची स्पर्श होऊ नये , ध्वजावर कोणत्याही प्रकारचे अक्षरे लिहू नये ,कोणतीही वस्तू देण्याचे , घेण्याचे बांधण्याचे किंवा वाहन नेण्याचे साधन म्हणून तसेच इमारतीचे आच्छादन म्हणून ध्वज वापरता येणार नाही. याची सुद्धा काळजी घेण्यात आली आहे. सन्मानपूर्वक ध्वज लावण्यात आले. १५ ऑगस्ट ला सायंकाळी सन्मानपूर्वक ध्वज कांध्यावर उतरून सम्मान केले असल्याचे दिसुन आले आहे. ध्वज संहितेचे पालन केले आहे. खाजगी आस्थापनावरही ध्वज फडकवण्यात आले आहे. प्लास्टिक व कागदी ध्वज वापरू नये याची खबरदारी देखील घेण्यात आली आहे. यावेळी ग्राम पंचायत सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, शाळा व्य. समिती , आशा सेविका , माता पालक संघ , तलाठी , ग्रामसेवक , आरोग्य अधिकारी, ग्रा.पं. सदस्य , शिक्षक , विद्यार्थी,विद्यार्थिनी , ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. वनवास धनिस्कार सर, आभार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मा. नरेन्द्र उरकुडे सर यांनी मानले.


0 टिप्पण्या