धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :-लाखनी तालुक्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल तिथून पाण्याची व्यवस्था करून रोवणी आटोपली. पण मागील १२-१३ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतजमिन कोरडी पडून शेतीस भेगा पडलेल्या आहेत. तर झालेली रोवणी वाळण्याचे मार्गावर आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खरीप हंगाम २०२३ मध्ये पहिल्या मृग नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिली.त्यामुळे पेरणी उशिरा झाल्या त्यानंतर आद्रा नक्षत्राचे सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने पेरणी करण्यात आली. ज्यांचेकडे ओलिताची सोय आहे. अश्या शेतकऱ्यांनी आद्रा नक्षत्रात रोवणी सुरुवात केली. पुनर्वसु नक्षत्राचा पाऊस झाला. पण सरासरी पेक्षा कमी असला तरी शेतकऱ्यांनी रोवणी सुरुवात केली.तालुक्यातील शेतकऱ्यांनी मिळेल त्या साधनाने पाण्याची व्यवस्था करून रोवणी आटोपली. पण मागील १२-१३ दिवसांपासून पावसाने दडी मारली. तर प्रखर उष्णतेमुळे रोवणी केलेल्या शेतजमिनीत भेगा पडल्या असून रोवणीही वाळण्याचे मार्गावर असल्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी मिळेल त्या साधनाने सिंचनाची सोय करताना दिसून येत आहे. गेल्या १२-१३ दिवसांपासून पावसाची सर हि कोसळली नाही. त्यामुळे शेतात भेगा पडल्या असून सिंचनाअभावी धानपीक करपण्याच्या मार्गावर आहे. अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नेरला उपसा सिंचनाचे काम अपूर्ण
जिल्ह्याची जीवनदायीनी समजल्या जाणऱ्या वैनगंगा नदीवर गोसेखुर्द प्रकल्प उभारण्यात आला. त्यातून नेरला उपसा सिंचनाचे कालवे तयार करण्यात आले. मात्र कालव्यांना पाणी नसल्याने कालवे बांधून काय उपयोग असा सवाल शेतकरी करीत आहेत. तर कालव्यांचे काम अजूनही अपूर्ण असल्याने त्याचा शेतकऱ्यांना उपयोग कधी होईल असा प्रश्न निर्माण होत आहे.
शेतातील कृषी पंपाना महावितरण चे ग्रहण
शेतातील कृषी पंपांचा विद्युत पुरवठा दिलेल्या तक्त्यानुसार वीज वितरण कंपनीकडून कधीच पूर्णवेळ वीज पुरवठा केला जात नाही. त्यामुळे सिंचनाची सोय असूनही सिंचन करता येत नाही. त्यामुळे धान पिकाची वाईट परिस्थिती असल्याने महावितरण कडूनही कृषी पंपांना शॉक दिला जात आहे.
प्रतिक्रिया
माझ्याकडे ०.६० आर शेतजमीन असून त्यात साधना प्रजातीच्या धानाची लागवड केली असून मागील दीड आठवड्यापासून पाऊस आला नसल्याने शेतात भेगा पडून पीक करपण्याच्या मार्गावर आहे.
टिकेश्वर बावनकुळे, शेतकरी


0 टिप्पण्या