Ticker

6/recent/ticker-posts

पेठ तालुक्यात महिला आघाडीच्या मुलाखती पार पडल्या


रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515

नाशिक :- जिल्ह्यातील पेठ तालुका येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने तालुकानिहाय कार्यकारणी निवड प्रक्रियेसंदर्भात मुलाखती तसेच पक्षप्रवेश सोहळा महिला जिल्हाध्यक्ष उर्मिलाताई गायकवाड ह्यांच्या अध्यक्षतेखाली पेठ तालुक्यातील गंगोडबारी ह्या ठिकाणी पार पडला.

ह्यावेळी मा.सरपंच हिरामण माळवे ह्यांच्या पत्नी जिजाबाई माळवे ह्यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तसेच त्यांच्यासह अनेक महिलांनी पक्षप्रवेश केला. ह्यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रामस्थांचे मार्गदर्शन केले व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

ह्या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महा. सचिव पंडित नेटवते, जिल्हा नेते बाळासाहेब शिंदे, युवा नेत्या कोमल पगारे, नाशिक तालुकाध्यक्ष कल्पना शिंदे, बाळासाहेब जाधव, दीपक भंडारी पेठ तालुकाध्यक्ष संदीप पगारे, गंगोटबारीचे सरपंच हिरामण माळवे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या