रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515
मालेगाव :- वंचित बहुजन आघाडी,मालेगांव तालुका यांच्यातर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त मालेगांव तालुका पदाधिकारी सलीमभाई शेख यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव संजय जगताप, युवा जिल्हाध्यक्ष किरण मगरे यांच्यासह जिल्हा प्रवक्ते यशवंत निकम, मालेगांव शहराध्यक्ष कैलास लोहार, तालुका महासचिव शशीकांत पवार, कोषाध्यक्ष सिद्धार्थ ऊशिरे, उपाध्यक्ष विनोद जगताप,विशाल जाधव,कादिर शेख,सचिव अलीम शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सलीम शेख यांच्या पुढाकाराने झालेल्या अतिशय उत्कृष्टरित्या आणि नियोजनबध्द पद्धतीने पार पडलेल्या ह्या कार्यक्रमात शशिकांत पवार यांनी सूत्र संचालन केले. उपस्थितांमध्ये विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक व इतर महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.


0 टिप्पण्या