Ticker

6/recent/ticker-posts

वंचित युवा आघाडीच्या मोफत कामगार नोंदणी ला उस्फुर्त प्रतिसाद


रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515


खामगाव : - वंचित बहुजन युवक आघाडी खामगाव तालुक्याच्यावतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बांधकाम कामगार व असंघटित मजूर यांच्या मोफत नोंदणीचे आयोजन दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी स्थानिक पत्रकार भवन येथे युवक तालुकाध्यक्ष अमोल शेगोकार यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.

यावेळी शहरासह तालुक्यातील असंख्य मजुरांनी त्यामध्ये सहभाग नोंदविला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव आतिश भाई खराटे हे उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे होते. 

त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चौकसे,विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष शरद भाऊ वसतकार,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंत,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संघपाल भाऊ जाधव, तालुका अध्यक्ष प्रभाकर वरखडे, युवा तालुकाध्यक्ष अमोल शेगोकार विष्णू दादा गवई, हर्षवर्धन दादा खंडारे,ऍड.अभिजीत वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

 कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली सदर शिबिरामध्ये शहरासह तालुक्यातील 500 मजुरांनी सहभाग नोंदवत आपली नोंदणी करून घेतली. यावेळी महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विशाखा ताई सावंग यांनी या नोंदणीतून मिळणाऱ्या योजना समजावून सांगत मार्गदर्शन केले. तसेच कामगारांच्या समस्या बाबत सरकारची उदासिनता असल्यामुळे असंख्य मजुरांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याची टीका भाई आतिश खराटे यांनी केली तर इथले सत्ताधारी पक्ष कामगारांना न्याय न देता भांडवलदारांचे हित जोपासण्यात धन्यता मानतात. त्यामुळे माञ वंचित बहुजन आघाडी हाच एक मेव पक्ष वंचितांचे हित जोपासणारे कार्यक्रम राबवत असतो, त्याचा एक भाग म्हणून आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुमेध सावंत,निखिल सावंग,हर्षवर्धन वानखडे,मानस गवळी,रत्नाकर सावदेकर,अक्षय हिवराळे,शेख अझहर,स्मिता ताई इंगळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गिरीष उमाळे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या