Ticker

6/recent/ticker-posts

डोणगाव ता. जामखेड येथे आज पासून आठवडे बाजार सुरू... नागरिकांचा मोठा प्रतिसाद... गटशिक्षणाधिकारी मा. श्री. बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सन्मान...

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :- जामखेड तालुक्यातील डोणगाव या गावी आज पासून आठवडे बाजार चालू करण्यात आला आहे. डोणगाव ग्रामस्थांचा व शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद दिसून येत आहे. आज पासून दर शनिवारी खंडोबाच्या मंदिरासमोर आठवडे बाजार भरणार असल्याचे ग्रामपंचायत चे सरपंच नितीन वारे व उपसरपंच अजित यादव यांनी सांगितले.
       त्यावेळी  डोणगाव चे सुपुत्र  जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
    
       त्यावेळी जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.बाळासाहेब धनवे,जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मा. अनिल भारती साहेब, डोणगाव चे सरपंच नितीन वारे,उपसरपंच अजित यादव, पोलीस पाटील बिबीशन यादव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पोपट जमदाडे, मा.सरपंच सुभाष धनवे, मा.सरपंच बाळासाहेब यादव, माझी सरपंच अर्जुन यादव , ग्रामपंचायत सदस्य अमोल यादव, अण्णा यादव, आबा पोठरे, राजेंद्र धनवे सर, संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव सातव, प्रशांत साळवन,बाबासाहेब धनवे, श्रीपती पवळ, कांतीलाल धनवे, बारकू धनवे, संभाजी गायकवाड,अशोक यादव,शामराव मोरे, मनोज मोरे, बाळासाहेब गायकवाड, पत्रकार पोपट मोरे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या