Ticker

6/recent/ticker-posts

बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने नूतन जिल्हा आरोग्य अधिकारी मा. सचिन भायेकर यांचा सत्कार संपन्न.


रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515

जळगांव :- बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने कळवू इच्छितो की , आज दिनांक ११/०८/२०२३ रोजी जळगांव जिल्हा परिषदेमध्ये  नव्याने हजर झालेले जिल्हा आरोग्य अधिकारी मा. सचिन भायेकर साहेब यांचा सह२०२ सत्कार करण्यात आला.
         यावेळी बहुजन कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष मांगोराव साळुंखे ( महाराज ) व बहुजन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे नेते तथा राज्याध्यक्ष श्री. भास्करराव हिवाळे यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्यशैलीचे अभिनंदन करण्यात आले. याबाबत दोन दिवसापूर्वी काही प्रकरणे पेंडिंग होती, चोपडा तालुक्यातील श्री. चव्हाण यांचा गेल्या अनेक महिन्यापासून पगार स्थगित होता सदरचा पगार सी. ई. ओ. साहेबांचा आदेश घेऊन भायेकर साहेबांनी '' सेम डे " ला अदा करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे जामनेर तालुक्यातील राजू सुनगत या स्लीपर कर्मचाऱ्याची अर्धपगारी आदेश त्वरित निर्गमित करण्यात येणार आहे असेही सांगितले. असे यावेळी विभागीय अध्यक्ष मांगोराव साळूंखे यांनी नमूद केले आहे.

 जिल्हा परिषद जळगांव येथे नव्याने हजर झालेले जिल्हा आरोग्य अधिकारी मा. सचिन भायेकर साहेब यांचा सत्कार करतांना बहुजन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे नेते तथा राज्याध्यक्ष श्री. भास्करराव हिवाळे , विभागीय अध्यक्ष श्री. मांगोराव साळुंखे इत्यादी...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या