• लाखनी तालुक्यातील चान्ना/धानला येथील घटना
• पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
मो.9545914324
भंडारा:- डोकेदुखीचे आजाराला कंटाळून ४३ वर्षीय इसमाने विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी रात्री ८:०० वाजता दरम्यान घडली. मृतकाचे नाव कुंजनराज मोतीराम वरकडे(४३) चान्ना/धानला, तालुका लाखनी असे आहे. लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
मृतक कुंजनराज याला मागील अनेक दिवसापासून डोकेदुखी व लिव्हर चा आजार असल्यामुळे त्यांना असह्य वेदना होत असत या आजारास कंटाळून त्यांनी २ ऑगस्ट रोजी विषारी औषध प्रधान केल्याचे पत्नीस सांगितल्याने कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे भर्ती केले. उपचारादरम्यान त्याचा ९ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. भंडारा पोलिसांनी मर्ग क्रमांक ००/२३ ची केस डायरी पोलिस ठाणे लाखनी येथे पाठविल्याने लाखनी पोलिसांनी मर्ग क्रमांक २९/२०२३ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली. कलम १७४ सीआरपीसी नुसार पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार गौरीशंकर कडव तपास करीत आहेत.


0 टिप्पण्या