गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद
मो.8308128457,
औरंगाबाद :- पैठण तालुक्यातील बिडकीन येथे दि.२६/८/२०२३ शनिवार रोजी सायंकाळी ६:०० वाजेच्या दरम्यान ऑल इंडीया पँथर सेनेच्या वतीने पँथर डरकाळी जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी चितेगाव ते बिडकीन भव्य दिव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.या पँथर डरकाळी जाहिर सभेला संबोधीत करण्यासाठी ऑल इंडीया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विद्रोहाचा विस्फोट करणारा बंडखोर नेता आणि बहुजनांचा पँथर मा.दिपक भाई केदार यांची बिडकीन मध्ये राॅयल ऐंट्री होताच फटाक्याच्या अतषबाजी करुण ढोलताशाच्या गजरात शहरातील विश्वरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णकृती पुतळ्यास अभिवादन करुन शासकीय विश्राम ग्रह परिसरात महापुरुषाला वंदण करुण पँथर डरकाळी जाहिर सभेला सुरुवात झाली.यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष मा.दिपक भाई केदार यांनी सरकारला धडा शिकविण्यासाठी आम्ही कटीध्द आहोत,दलीतांच्या न्यायहक्कासाठी लढणारे पँथर आहोत.सरकारकडून दलीत मुस्लिम आदिवासींच्या हत्याकांडाचा कटकारस्थान रचण्यात येत आहे असेही पँथर दिपक भाई केदार म्हणाले.याप्रसंगी प्रमुख उपस्थिती विनोद भोळे(महाराष्ट्र अध्यक्ष),सचिन तिवारी(महाराष्ट्र महा सचिव),गजानन साळवे(मराठवाडा सचिव),बिडकीन पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश सुरवसे,अमोल शेजवळ(जिल्हा अध्यक्ष),कमलेश दाभाडे(युवा जिल्हा अध्यक्ष), फिरोज पठाण(ग्रा.जिल्हा अध्यक्ष),गौतम चक्रनारायन(ग्रा.जिल्हा कार्याध्रक्ष),अमर लोखडे(जिल्हा संघटक),ज्योतीताई जुमडे(जिल्हा अध्यक्षा महिला अघाडी),अकाश जंगले,वैशालीताई सिरसाठ(भोकरदन ताअध्यक्षा महिला अघाडी),विशाल आल्हाट(वैजापुर ता.अध्यक्ष) यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी संयोजन समिती मिलिंद नरवडे(ग्रा.जिल्हा अध्यक्ष),रवी नरवडे(ग्रा.जिल्हा संघटक),भुषण वाघ, निर्मलाताई भगुरे(जिल्हा उपाध्यक्षा महिला आघाडी),शाहरुख भाई पठाण(पैठण तालुका अध्यक्ष),ज्योतीताई शिंदे(ता.अध्यक्षा महिला अघाडी),नरेश रोडगे,अक्षय वाकडे,जिवन नरवडे,अजय भिवसने,सुरज बर्फे,अक्षय नरवडे,राहुल इंगळे,किरण नरवडे यांनी अथांग परिश्रम घेतले.या पंथर डरकाळी जाहिर सभेला अनेक जिल्ह्यातुन व औरंगाबाद जिल्ह्यातुन व पैठण तालुक्यातुन व बिडकीन शहर व पंचकृशीतील पँथर न नागरीक आणि महिला मोठ्या संख्येने हजर होते.


0 टिप्पण्या