गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद
मो.8308128457,
औरंगाबाद :-आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर पैठण येथे रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त राखी तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
इयत्ता ५वी ते ७ वी मधिल सर्व विद्यार्थिनींनी उत्साहाने भाग घेतला, आणि सुंदर सुंदर अशा राख्या तयार केल्या.यामध्ये प्रमुख मार्गदर्शन श्रीमती. राखी धोकटे यांनी विद्यार्थ्यांना कार्डशीट पासून राखी तयार करणे, लोकरी पासून राखी तयार करणे, मोठ्या करांच्या टिकल्यांपासून राखी तयार करणे, तसेच काडेपेटीतील काड्यांचा वापर करूनही आपल्याला किती सुंदर राखी तयार करता येते हे विद्यार्थ्यांना दाखवले. यासोबतच साध्या कागदाला सजवून मनी मोती चमकी हे वापरून विद्यार्थी खूप सुंदर राख्या तयार करत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री. कुंभार सर यांनी स्वीकारले होते. विद्यार्थ्यांच्या राख्या पहात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले .मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व सहकारी बंधू-भगिनींनी देखील कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती समृध्दी डिघुळे यांनी केले.


0 टिप्पण्या