रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515
भंडारा :- दिनांक 29 ऑगस्ट रोजी ग्रा.पं. सदस्य , भाजप पवनी तालुका अध्यक्ष (अल्पसंख्यांक सेल)चे सोहेल खान यांच्या निवासस्थानी मा. डॉ. परिणय जी फुके (माजी पालकमंत्री भंडारा जिल्हा) यांनी सदिच्छा भेट दिली तथा कार्यकर्त्यांशी चर्चा करून गावं वासियांच्या समस्या जाणून घेतल्या. सोहेल खान यांचे परिवाराचे मतीन खान, जुबेर खान, ग्रीन हेरिटेज संस्था चे अध्यक्ष सईद शेख, शहजाद खान यांनी पुष्पगुच्छ देऊन मा फुके यांचे स्वागत केले .कार्यकर्त्यांशी चर्चा करून अड्याळ ग्रामस्थांच्या विकास कामे,शालेय_शिक्षण,शेती,पर्यटन, अल्पसंख्यांक बाबत समस्या व अडचणी फुके यांनी जाणून घेतल्या त्या समस्याचे निराकरण करून ते लवकरात लवकर ते पूर्ण होतील असे आश्वासन दिले या प्रसंगी स्विय सहाय्यक दिवाकर मने, आशिष पवार, भंडारा विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप ढोके, ज्येष्ठ कार्यकर्ते धनराज जीभकाटे, तिर्री चे माजी सरपंच सुरेंद्र ऐतुलवार, पंचायत समिती सदस्य प्रमोदजी मेंढे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तिलक वैद्य, लोकेश गभने, सामाजिक कार्यकर्ते अभिजित वंजारी, टिणू कुंभारे, प्रेम बारा पात्रे, खीलोन कुंभारे, गडकर,सहायता नगर चे मतीन शेख व इतर गावकरी उपस्थित होते.


0 टिप्पण्या