Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞‌

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌
‌इसवी सन २०२३ - १७ ऑगष्ट
‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०७९
‌भा. रा. २६ श्रावण १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू :   वर्षा
मास :  निज श्रावण  
पक्ष :   शुक्ल          
तिथी : प्रतिपदा (१७.३०) ~ द्वितीया                      
वार :   गुरूवार 
नक्षत्र : मघा (२०.००) ~ पूर्वा                            
राशी :  सिंह 

बृहस्पती पूजन 

*सूर्याचा मघा नक्षत्र प्रवेश* दुपारी १.३० ला (वाहन - घोडा)

गुरूदेव डॉ. काटे स्वामीजी जयंती, नगर 
*क्रांतीवीर मदनलाल धिंग्रा बलिदान दिन*

१६६६ : शिवाजी महाराज आग्र्याहून औरंगजेबाच्या नजर कैदेतून पसार झाले.
१८३६ : जन्मलेल्या प्रत्येक बालकाचा जन्म नोंदवला गेलाच पाहिजे, अशी सक्ती करणारा ‘रजिस्ट्रेशन ऑफ बर्थस्' कायदा ब्रिटिश संसदेने मान्यता दिल्याने अमलात आला. पुढे हा सर्व ब्रिटिश वसाहतींना लागू करण्यात आला आणि १८३७ पासुन त्याची अंमलबजावणी सुरू झाली.
१९५३: नार्कोटिक्स अ‍ॅनॉनिमस या संस्थेची पहिली सभा दक्षिण कॅलिफोर्नियात झाली.
१९८२: पहिली सी. डी. जर्मनीमधे विकण्यात आली.
१९८८: पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक आणि अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नॉल्ड रॅफेल विमान अपघातात ठार झाले.
१९९९ : तुर्कस्तानच्या इझ्मीत शहरा जवळ रिष्टर स्केलवर ७.४ तीव्रतेच्या झालेल्या भूकंपात १७००० लोक मृत्यूमुखी व ४४००० जखमी 
२००८: एकाच ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरले.

जन्मदिवस 
१७६१: पं. विल्यम केरी – अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक.
१८८८ : गुरुवर्य बाबूराव गणपतराव जगताप – बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी झटणारे कार्यकर्ते, श्री शिवाजी मराठा हायस्कूलचे संस्थापक (१९१८), पुण्याचे महापौर (१९६२)
१८९३: मे वेस्ट, हॉलीवूडमधील अभिनेत्री, सौंदर्यवती, गायिका, संवादलेखिका. 
१९०५: ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते 
१९१६ : डॉ. विनायक विश्वनाथ तथा ’अप्पासाहेब’ पेंडसे – शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक.
१९१६: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध हिंदी भाषिक लेखक व साहित्यिक, उत्कृष्ट कादंबरीकार, अमृतलाल नागर
१९३२: नोबेल पारितोषिक विजेते त्रिनिदादी-भारतीय लेखक व्ही. एस. नायपॉल
१९४१: भारतीय रिजर्व बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान.
१९४४: ओरॅकल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक लैरी एलिसन
१९४९ : निनाद गंगाधर बेडेकर, इतिहासकार, लेखक, वक्ते आणि संशोधक.

मृत्यूदिन 
१९०९: भारतमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची हत्या करणारे क्रांतीकारक, मदनलाल धिंग्रा यांना फाशी देण्यात आली. त्यांनी न्यायालयात स्वतःहून फाशीची शिक्षा मागितली होती. 
१९४९: महान भारतीय क्रांतिकारक व स्वतंत्रता सेनानी तसंच, ढाका अनुशीलन समितीचे संस्थापक अध्यक्ष पुलिन बिहारी दास. 
२००५: जॉन एन. बाहॅकल – हबल स्पेस टेलिस्कोपचे सहनिर्माते. 
२०२०: पंडित जसराज (न्यू जर्सी-अमेरिका) हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील मेवाती घराण्याचे गायक, पद्मविभूषण. संगीत ही ईश्वरी कला जनसामान्यांपर्यंत नेणारे आम्ही फक्त त्या ईश्वरी शक्तीचे दूत आहोत असे ते मानत.

*।। दास-वाणी ।।* 

सुण्यास व्याघ्र नाम ठेविलें । 
पुत्रास इंद्रनामें पाचारिलें । 
कुरूप परी आळविलें । 
सुंदरा ऐसें  ।। 

मूर्ख नामे सकळकळा । 
राशभी नामें कोकिळा । 
नातरी डोळसेचा डोळा । 
फुटका जैसा  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १४/१०/१३-१४ 

माया दिसते तरी ती मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे सत्याचा आभास परंतु सत्य नव्हे.
एखाद्या रस्त्यावरच्या मरतुकडया गावठी कुत्र्याला वाघ्या म्हटल तरी तो वाघ्या कसा होईल ?
मुलाला इंद्र म्हणून हाक मारली म्हणून तो देवांचा राजा कसा होईल?
एखाद्या कुरूप स्त्रीला सौंदर्यवती म्हणून नावाजावी तशी माया आहे.

महामूर्खाला सकल कलासंपन्न अशी पदवी द्यावी, किंवा गावभर रेकणाऱ्या गाढवीला सुश्राव्य कोकिळा म्हणून संबोधिले. तशीच माया मानावी.
डोळा फुटका असलेल्या मुलीला सुनेत्रा म्हणून हाका मारणे जेवढे हास्यास्पद तितकेच मायेला सत्य म्हणून मानणे हे देखील ! 

मायानिरूपण समास.

 🙏 💐💐💐💐 💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या