जि.प. सदस्या डॉ. मनीषा निंबार्ते यांचे प्रतिपादन
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
मो.9545914324
भंडारा :- केंद्र व राज्य सरकारने ओबीसी ची जनगणना करावी. यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी सर्व पक्षातील ओबीसींनी एकत्र येऊन सरकारविरुद्ध संघर्ष करणे गरजेचे आहे. यासाठी पक्षभेद विसरून ओबीसी जनगणनेसाठी सर्वांनी मिळून लढा उभारावा असे जि.प. सदस्या डॉ.मनीषा निंबार्ते यांनी मंडल जनजागृती यात्रेनिमित्त लाखनी येथे मार्गदर्शन करतांना आपले विचार व्यक्त केले.
7 ऑगस्ट 1990 ला ओबीसी ना अधिकार देणारा मंडल आयोग लागू झाला. या दिनाचे औचित्य साधून ओबीसी समाजात मंडल आयोगा विषयी जनजागृती व्हावी. या उद्देशाने ही मंडल यात्रा विदर्भातील 7 जिल्ह्यात 30 जुलै ते 6 ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्व विदर्भात फिरत आहे. केंद्र व राज्य सरकारने ओबीसीची जनगणना करावी, ओबीसींचे 72 वस्तीगृह त्वरित सुरू करावेत, ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करावी, ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्वरित द्यावी, शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू करावा. या प्रमुख मागण्यासाठी ही मंडल यात्रा निघाली आहे. लाखनी येथे मंडल यात्रा येताच साई मंदिराजवळ मंडल यात्रेचे स्वागत करण्यात आले. डॉ.बाबासाहेब यांच्या स्मारकाला अभिवादन करून ही मंडल यात्रा ढोल ताश्याच्या गजरात सभास्थळी आणण्यात आले.
सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाळकृष्ण सार्वे, मार्गदर्शक उमेश कोरराम, जयंत झोडे,प्रा. अनिल डहाके, दीनानाथ वाघमारे,
विशेष अतिथी जि. प. सदस्या डॉ. मनीषा निंबार्ते, पं. स. सभापती प्रणाली सार्वे, नगरसेवक प्रदीप तितीरमारे, विशेष उपस्थिती मनोज ईश्वरकर, कमलेश झंजाळ, विलास गोमासे, गोपाल सेलोकर, सदानंद इलमे, के. झेड. शेंडे, संजय मते, जयकृष्ण फेंडरकर, डॉ. नांन्हे विचार पिठावर उपस्थित होते.
7 आगस्ट हा ओबीसींचा अधिकार दिन असून याच दिवशी ओबीसी व्हीजे एनटी, एसबीसी बांधवांना त्यांचे संविधानिक हक्क आणि अधिकार मिळाले म्हणून हा दिवस ओबीसी बांधवाणी "ओबीसी अधिकार दीन" म्हणून साजरा करावा असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.बाळकृष्ण सार्वे यांनी व्यक्त केले. ओबीसींचे 72 वस्तीगृह सुरू होईपर्यंत हा मंडल रथ थांबणार नाही असे मत उमेश कोरराम यांनी मांडले. या मंडल यात्रेच्या कार्यक्रमात "ओबीसी समाज भूषण" म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य माधवराव भोयर यांना शाल श्रीफळ देऊन संघटनेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा समन्वयक प्रा. उमेश सिंगनजुडे, प्रास्ताविक यादोराव गायकवाड, तर आभार आनंदराव उरकुडे यांनी मानले.


0 टिप्पण्या