Ticker

6/recent/ticker-posts

निरपेक्ष सेवा हीच पदाला मोठे करते



• गटविकास अधिकारी रोहिणी डोंगरे यांचे प्रतिपादन

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
मो.9545914324

भंडारा :- सेवा काळात जनतेची सेवा ही पदापेक्षा उत्तम असल्याने सेवा हीच आपल्या पदाला मोठे करीत असते  आजपर्यंतच्या सेवाकाळात सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उत्तमरित्या साथ दिल्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त करीत सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभात सत्काराला उत्तर देताना सेवानिवृत्त गटविकास अधिकारी रोहिणी डोंगरे यांनी  मनोगत व्यक्त केले. 
              पंचायत समिती लाखनी च्या गटविकास अधिकारी रोहिणी आर. डोंगरे ३० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सोमवार(ता.३१) रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यांनी तब्बल २९ वर्षे कृषी विभागात कृषी विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी जि. प. भंडारा या पदावर सेवा दिली असून त्यांची सेवाजेष्ठतेनुसार सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून दि.११ नोव्हेंबर २०२२ ला पंचायत समिती लाखनी येथे रुजू झाल्या. डॉ. शेखर जाधव स्थानांतरणाने ५ मे २०२२ पासून प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून कामकाज चालविले.  त्या ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाल्याने पंचायत समिती सभागृहात छोटेखानी कार्यक्रमात रोहिणी डोंगरे यांना भावपूर्ण निरोप व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. 
                कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. स. सभापती प्रणाली सार्वे, प्रमुख उपस्थितांमध्ये उपसभापती गिरीश बावनकुळे, जि.प.सदस्या विद्या कुंभरे, सरिता कापसे, पंचायत समिती सदस्य रविंद्र(दादू) खोब्रागडे, किशोर मडावी, सुनील बांते, विकास वासनिक, सुरेश झंझाड, पंचायत समिती सदस्या अस्विनी मोहतुरे, मनीषा हलमारे,  योगिता झलके यांनी उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले. याशिवाय पंचायत विस्तार अधिकारी दामोधर लंजे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मूलचंद केवट, कृषी विस्तार अधिकारी आर.एस.भांडारकर, गटशिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे यांनीही सेवानिवृत्त गटविकास अधिकारी रोहिणी डोंगरे यांनी सेवा काळात केलेल्या विशेष बाबींचा उहापोह केला. कार्यक्रमाचे संचालन व आभार कृषी विस्तार अधिकारी के.एन. चव्हाण यांनी मानले. पंचायत समिती चे सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी या छोटेखानी सेवानिवृत्ती समारंभास उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या