Ticker

6/recent/ticker-posts

संघर्षनायक केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस रिपब्लिकन पक्षातर्फे संघर्षदिन म्हणून देशभर साजरा होणार

चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री 
ना. रामदास आठवले हे देशभरातील बहुजनांचे संघर्षनायक, लोकनेते म्हणून लोकप्रिय आहेत. संघर्षनायक ना. रामदास आठवले यांचा 25 डिसेंबर हा वाढदिवस रिपब्लिकन पक्षाच्यावतीने दरवर्षी देशभर संघर्षदिन म्हणून साजरा केला जातो. येत्या 25 डिसेंबर 2023 रोजी केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून देशभर साजरा करण्यात येणार आहे.

 रिपब्लिकन पक्षाच्यावतीने देशभरात सर्व राज्यात  ना.रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमीत्त गरिबांना मोफत अन्न, वस्त्र, शाल;चादर ;वही पेन शैक्षणिक साहित्य वैद्यकीय मदत महिलांना साडी  वाटप केले जाणार आहे. तसेच देशभर विविध सामाजिक उपक्रम राबवुन ना.रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन साजरा करण्यात येणार आहे.  

 संघर्षनायक केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून साजरा करतांना मुंबईसह सूंपर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात विविध जिल्हयांमध्ये रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या वतीने अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांना मोफत फळे बिस्कीट  वाटप करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी रक्तदान शिबीरे ;आरोग्य तपासणी शिबीर; चष्मा वाटप; दन्त चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत. 

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रक्तदान शिबीर, विविध रुग्णालयांमध्ये फळ वाटप करण्यात येणार आहेत. तसेच अनेक बुध्द विहारांमध्ये लाडुंचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच अनेक गरिबांना थंडीपासून वाचण्यासाठी चादर, ब्लँकेटचे वाटप करण्यात येणार आहे. गोरगरिब विद्यार्थ्यांना एक वही एक पेन सुध्दा वाटप करुन संघर्षनायक ना. रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या राजकीय वाटचालीमध्ये अत्यंत कठीण संघर्ष केला आहे. संघर्षाचे दुसरे नांव म्हणजे रामदास आठवले आहे. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना संघर्षनायक नेते म्हणून गौरविले जाते. संघर्षनायक ना.रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देशभर साजरा केला जातो. संघर्षदिनानिमीत्त रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या वतीने विविध ठिकाणी समाजपयोगी उपक्रम राबवुन संघर्षदिन म्हणून ना.रामदास आठवले यांचा वाढदिवस साजरा केला जातो. 
 
 घाटकोपर भिमनगर येथे नुकताच रिपाइंचे 
प्रसिध्दीप्रमुख हेमंत रणपिसे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी रिपाइंचे प्रसिध्दी प्रमुख  हेमंत रणपिसे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले. यावेळी रिपाइंचे मुंबई प्रदेश  कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड, अरुण पाठारे, विजय साबळे, घाटकोपर तालुका अध्यक्ष अनिल जाधव, संदेश हाटे नैनाताई वैराट आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या