चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-ओ बी सी समाजाच्या न्यायोचित मागण्या मान्य करण्यासाठी ओ बी सी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी पोष्ट कार्ड पाठवा अभियान सुरू करण्यात आला असून या अभियानास विद्यार्थी ,पालक व जनसामान्य नागरिकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद मिळत असून या अभियानात तुमसर,मोहाडी,भंडारा,पवनी,
लाखनी, साकोली व लाखांदूर तालुक्यातील शाळा ,महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थी, तसेच पालक व गावागावांतील गणमान्य नागरिकांनी आपल्या संविधान दत्त हक्क अधिकार न्यायासाठी केंद्र व राज्य शासनाला पोष्ट कार्ड पाठवा अभियानात सहभागी होऊन मागण्या मान्य करण्याचा आग्रह धरावा असे आवाहन ओ बी सी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी या अभियानाच्या माध्यमातून केले आहे.
भारतीय संविधानातील तरतुदीनुसार सत्ताधाऱ्यांनी ओ बी सी समाजाला त्यांचे जन्मजात
संविधान दत्त हक्क अधिकार व न्याय प्रदान करणे गरजेचे असताना याकडे सत्ताधाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने ओ बी सी समाज हा विकासापासून कोसो दूर आहे.
या देशातील पशू,पक्षि,जनावरांची गणना केली जाते परंतु माणसासारखा माणूस असतांना ओ बी सी समाजाची जात निहाय जनगणना केली जात नाही, ओ बी सी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह तयार करण्याचे आश्वासन दिल्या नंतरही वसतीगृहाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढल्या जात नाही. मराठा समाजाला कुणबी जातीचे दाखले देऊ नये,मराठा समाजाला ओ बी सी समाजात समाविष्ट करू नये,शासकीय नोकऱ्यांमध्ये ओ बी सी समाजाचा असलेला ब्याक लाग भरून काढल्या नाही,उद्योग
व्यवसायात ओ बी सी
समाजातील तरुण युवकांना संधी दिली जात नाही त्यामुळे ओ बी सी समाज संकटाच्या खाईत लोटला आहे यास सत्ताधाऱ्यांचे ओ बी सी समाजा विरोधी असलेले उपेक्षित,कुटील ,धोरण कारणीभूत आहे.
सत्तेत असलेल्या ओ बी सी समाजाच्या मंत्र्यांनी ओ बी सी समाजाच्या न्यायोचित मागण्यांबाबत जे आश्वासन दिले आहे ते आश्वासन २६ जानेवारी २०२४ पूर्वी पूर्ण करावे नाही तर आपल्या मंत्री,खासदार व आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे मात्र या कडे दुर्लक्ष करण्यात आले तर मंत्री व स्थानिक लोप्रतिनिधी असलेल्या खासदार,आमदारांना गावागावात पाय ठेवू देणार नाही असा सत्याग्रह करण्यात येईल व या बाबतची संपूर्ण जबाबदारी शासन प्रशासनाची राहील असा इशारा देण्यात येत आहे.
पोष्ट कार्ड पाठवा अभियानास तुमसर तालुक्यातील सिहोरा या
गावापासून सुरुवात झाली असून येथील शाळा , महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच पालक व नागरिकांनी या अभियानास पाठिंबा दिला आहे.अभियानचे नेतृत्व ओ बी सी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते,महिला संयोजिका शोभा बावनकर,संयोजक जीवन भजनकर, प. स.सदस्य सुभाष बोरकर,मनोज, पटले,सतीश सोनवणे,अकलेश ढबाले,जितू पटले प्रा.किरण मते तसेच प्राचार्य ,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व गणमान्य नागरिक उपस्थित होते.


0 टिप्पण्या