Ticker

6/recent/ticker-posts

अल्पसंख्यांक दिनानिमित्त धरणे आंदोलन

मुस्लिम  समाजासोबत दुजाभाव करू नका, जळगावात उर्दू घर चे त्वरित बांधकाम करून द्या मागणी

शेख अजगर शेख अकबर  संपादक मध्य प्रदेश मो.84838 43124

जळगाव :- भारतातील व महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाचे विशेषता शिक्षण आरक्षण व संरक्षणाचे प्रश्न अत्यंत बिकट होत चालले आहेत संविधानाने शासनास कुठल्याही प्रकारचे भेदाभेद न करता सर्व क्षेत्रांमध्ये अल्पसंख्याकांना समान न्याय देणे विषयी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत पण दुर्दैवाने देशातील व राज्यात सत्तेवर असलेल्या शासनाकडून अल्पसंख्याकांना व खास करून मुस्लिम समाजा सोबत दुजाभाव होताना दिसत आहे त्यामुळे मुस्लिम समाज सर्व क्षेत्रात मागे राहिला या पार्श्वभूमीवर अल्पसंख्यांक समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांच्या नेतृत्वात १८ डिसेंबर आंतर राष्ट्रीय अल्पसंख्याक दीना निमित्त जळगाव शहरातील व जिल्ह्यातील विविध राजकीय सामाजिक साहित्य क्रीडा व शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मुस्लिम व हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कार्यालयाबाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन केले
१२ मागण्यांचे निवेदन

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांना १२ मागण्याचे निवेदन महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मूर्म, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तसेच भारत सरकार व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग यांना निवेदनाच्या प्रति सादर करण्यात आल्या.

 आंदोलनात यांनी केले मार्गदर्शन

फारुक शेख यांनी धरणे आंदोलनाची पार्श्वभूमी व निवेदनाचे वाचन केले, मुफ्ती हारून नदवी, मौलाना बापू शहा ,मुबारक तडवी, मुकुंद सपकाळे, प्रदीप पवार, बंटी भैया पाटील, प्रभाकर आप्पा, ज्ञानेश्वर कोळी, आशुतोष पवार, देविदास ठाकरे, किरण कुमार, मजहर खान ,अहमद सर सलीम इनामदार अमजद पठाण शिबान फाईज ,रिजवान जागीरदार, सय्यद चांद, ताहेर शेख, अनिश शाह,रईस बागवान,फहीम पटेल, अनवर शिकलगर, अर्शद शेख,साहिल पठाण, आबीद खान आदींची उपस्थिती होती 
फोटो
१)धरणे आंदोलन करतांना
२) आर डी सी सोपान कासार यांना निवेदन देताना फारुक शेख आदी दिसत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या