Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌इसवी सन २०२३ - १९ डिसेंबर 
‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०८०
‌भा. रा. २८ मार्गशीर्ष १९४५
युगाब्द  ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू :   शरद
मास : मार्गशीर्ष 
पक्ष :  शुक्ल     
तिथी : सप्तमी (१३.००) ~ अष्टमी                         
वार : मंगळवार 
नक्षत्र : पूर्वभाद्रपदा (२४.००) ~ उत्तरभाद्रपदा    
राशी :  कुंभ (१८.२०) ~ मीन

*मित्र सप्तमी* (सूर्य व्रत)
*संत नरसी (नरसिंह) मेहता जयंती* (तिथीनुसार)
*शिव प्रताप दिन* (तिथीनुसार)
(अफजल खान वध)
*गोवा मुक्ती दिन*

२०१२: ज्यून-हाय पार्क ह्या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या.
२००६: शैलजा आचार्य ह्या भारता साठी नेपाळच्या पहिल्या राजदूत झाल्या.
१९९८: अमेरिकेच्या डेनवर मध्ये विश्व विकलांग स्कीइंग मध्ये शील कुमार यांना सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुरस्कार मिळाला.
१९८३: ब्राझिलमधील रिओ डी जानिरो येथुन फिफा वर्ल्ड कप चोरीस गेला.
१९६१: भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय नुसार गोव्यात प्रवेश केला.
१९६१:पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.
१९४१:दुसरे महायुद्ध - अ‍ॅडॉल्फ हिटलर हा जर्मन सैन्याचा सरसेनापती झाला.
१९२७:राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.
१९१९: अमेरिकेमध्ये हवामान संस्थेची स्थापना करण्यात आली.

जन्मदिवस :
१९३४:प्रतिभा पाटील – भारताच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती
१९१९:ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते 
१९०६:लिओनिद ब्रेझनेव्ह – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस
१८९९:मार्टिन ल्यूथर किंग – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे अमेरिकन नेते. 
१८९४:कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक. अरविंद मिल्स, अशोक मिल्स, अतुल असे अनेक उद्योग त्यांनी चालू केले. कामगार कल्याणासाठी सहकारी संस्था काढल्या.
१८५२:अल्बर्ट मायकेलसन – वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक

मृत्यूदिन:
१९९९: हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी – रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक
१९९८: जनार्दन विठ्ठल तथा जे. एल. रानडे – भावगीतगायक.
१९९७: सोनीचे सहसंस्थापक मासारू इबकू
१९९७:डॉ. सुरेन्द्र बारलिंगे – स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष 
१९८८: ज्ञानपीठ पुरस्कार पुरस्कार विजेते गुजराती साहित्यकार उमाशंकर जोशी.
१९२७:राम प्रसाद बिस्मिल – क्रांतिकारक 
१९१५:अलॉइस अल्झायमर – जर्मन मेंदुविकारतज्ञ 
१८६०:लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे - डलहौसी – भारताचा गव्हर्नर जनरल. त्यांनी सार्वजनिक बांधकाम खाते स्थापन करुन सुमारे ३,४०० किमी लांबीचे रस्ते केले. टपाल व तार यांची सेवा सुरू केली. मुंबई ते ठाणे हा लोहमार्ग त्यांच्याच कारकीर्दीत सुरू झाला.
१८४८:एमिली ब्राँट – इंग्लिश लेखिका

*।। दास-वाणी ।।*

येक म्हणती देवें केली । 
म्हणोनि हे विस्तारली । 
देवास इछया नस्ती जाली । 
तरी हे माया कैची  ।। 

येक म्हणती देव निर्गुण । 
तेथें इछा करी कोण । 
माया मिथ्या हे आपण । 
जालीच नाही  ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०८/०२/२७-२८ 

मायेचा उद्भव कसा झाला याविषयी
असंख्य मतमतांतरे आहेत. एक मत असे आहे की माया ही मुख्य देवाने त्याच्या संकल्पानुसार निर्माण केली आणि तिचा अफाट विस्तार झाला. देवाला ' एकोहं  । बहुस्याम्  । 
असा संकल्पच झाला नसता तर माया निर्माणच होऊ शकली नसती.

दुसरे मत असे आहे की परब्रह्म तर निर्गुण आहे. निर्गुणाच्या ठायी इच्छा होईलच कशी ? माया ही मिथ्या आहे. ती खरी नाही पण खऱ्याचा आभास आहे. त्यामुळे माया कल्पित आहे. तिला स्वतंत्र असे अस्तित्वच नाही.

खरे तर माया ही ईश्वराची अनादी शक्ती आहे.

मायोद्भवनिरूपण समास.

🙏💐💐💐💐💐🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या