मायक्रो ऑब्जरवरचे प्रशिक्षण संपन्न
संघदीप मेश्राम चित्रा न्युज
जालना- जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 च्या अनुषंगाने मायक्रो ऑब्जरवर म्हणून नियुक्त करण्यात आलेले अधिकारी/कर्मचारी यांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण जालना सेंट मेरी हायस्कूल येथे संपन्न झाले.
यावेळी निवडणूक निरीक्षक (जनरल) शैलबाला अंजना मार्टीन, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत हारकर, तहसिलदार छाया पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रशिक्षक तथा जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रेषित मोघे मोघे, नायब तहसिलदार श्री. घुगे, महसुल सहाय्यक अनिरुद्ध जुंबड, गणेश सर्वे, तहसिल कार्यालय, जालना येथील निवडणूक शाखेतील सर्व कर्मचारी, सर्व प्रशिक्षणर्थी सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा प्रशिक्षणात सहभाग होता.


0 टिप्पण्या