अर्पित वाहाणे चित्रा न्यूज
लातूर :-उदगीर तालुक्यातील वाढवणा बु. पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने केवळ ३० पोलिसांवर ४२ गावांच्या जबाबदारीचे ओझे आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो आहे.म्हणुन येथे पोलीसांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.अशी मागणी जनतेतून होत आहे
वाढवणा बु. ठाण्यांतर्गत वाढवणा, हाळी व हंडरगुळी,चिमाचीवाडी,किनी, मोरतळवाडी, डोंगरशेळकी, गुडसुर, नळगीर, टाकळी, वागदरी,चोंडी, सुमठाणा, कोदळी,ही व अन्य कांही उदगीर तालुक्यातील गावांबरोबर चाकूर, अहमदपूर तालुक्यातील काही गावे जोडण्यात आली आहेत.आणि या
सर्व गावांची अंदाजे लोकसंख्या ही लाखभर असु शकते.आणि या लाख
भर लोकांसह त्यांच्या लाखमोलांच्या
वस्तूंच्या रक्षणाची जबाबदारी तीस पोलिसांवर आहे.आणि वाढवणा पो. ठाण्याचा विस्तार मोठा आहे.तरीपण गत कांही वर्षापासुन या ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.यात सपोनि १, सपोउपनी १, नापोकाॅ १०,पोहेकाॅ १० मपोकाॅ ५, चालक २ असे पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. वरिष्ठांचे आदेश, तालुका, जिल्हा पातळीवरील बंदोबस्त, नेत्यांचे दौरे, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण,कोर्ट व वायरलेस ड्यूटी
असे विविध कार्यक्रम नित्याचे असतात. तसेच अनेकांची कंपलसरी साप्ताहिक सुट्टी असते.तर कांहीची रजा.यामुळे या ठाण्यात दैनंदिनी 20 एक कर्मचारी हजर असतात. ठाण्याअंतर्गत असलेल्या गावापैकी बहूतांश गावे अ गटातली आहेत. अशातच लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरू आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रजा मिळणेही मुश्किल झाले आहे.यामुळे अधिकारी व कर्मचारी डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात.या सर्व बाबीची वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेऊन पोलीसांची संख्या वाढविण्याची मागणी जनता करीत आहे.
हंडरगुळी येथे ठाणे व्हावे,जनतेची
मागणी हाळी हंडरगुळी गावांची जनसंख्या अंदाजे पस्तीस हजारांच्या आसपास आहे.राज्य मार्गावर हे गाव असल्याने व आठवडी गुरांसह भाजीपाल्यांचा बाजार हा हंडरगुळीत भरतो. यामुळे येथे नेहमी छोट्या मोठ्या घटना आणि गुन्हे घडतात. त्यामुळे येथे
असलेले पोलिस कर्मचारी ही कमी पडतात.
म्हणुन व भविष्याचा विचार करुन येथे पोलिस ठाणे असणे गरजेचे आहे.त्यामुळे येथे असलेल्या दुरक्षेञाचे रुपांतर पोलिस ठाण्यात करावे,व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी अशी हाळीहंडरगुळीसह परिसरातील आम जनतेची मागणी आहे.तसेच या बाबींकडे तीनही पक्षांच्या तालुका अध्यक्षांनी लक्ष देणे गरजेचे आहे..तेंव्हा याकडे कोणता पक्ष व त्याचा तालुका अध्यक्ष याप्रश्नी लक्ष घालणार.याकडे हाळी परिसरातील आम आदमीचे लक्ष लागले आहे.तसेच
वाढती लोकसंख्या व पोलिसांवरील ताण हे लक्षात घेता पोलिसांची सध्या असलेली संख्या अपुरी पडत आहे.
आणि म्हणुन वाढवण्यात पोलीसांची
संख्या वाढविणे गरजेचे आहे.तसेच भविष्याचा विचार करता हंडरगुळीत ठाणे होणे गरजेचे आहे.आणि हे सर्व वरच्या लेवलच्या गोष्टी आहेत.असे
मत एका पोलिसांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले तसेच अपुरा कर्मचारीवर्ग असलातरी पण आम्ही सतत जनसेवेत तत्पर असुन,कर्मचारी वाढविणे गरजेचे आहे.असे मत सपोनी.भिमराव एस.
गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना व्यक्त केले आहे .


0 टिप्पण्या