Ticker

6/recent/ticker-posts

भटके विमुक्तांच्या हक्क व विकासाचा जाहीरनामा देऊन मा.श्री.दिलीप खेडकर साहेब यांचे भवरवाडी येथे स्वागत..


सुजित धनवे चित्रा न्युज 
जामखेड :- दि.5 मे 2024 रोजी अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक मतदार संघाचे बहुजन ओबीसी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार *मा.श्री.दिलीप कोंडीबा खेडकर (साहेब)* हे पाटोदा,भवरवाडी,अरणगाव माहिजळगाव,मिरजगाव,कर्जत, राशीन,खेड या गावातील वाडी वस्ती प्रत्येक घराघरांमध्ये जाऊन सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार करत असतानी 
        भवरवाडी येथील भटके विमुक्त समूहातील नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने मा.श्री. दिलीप कोंडीबा खेडकर साहेब यांचे वाजत गाजत तोफा वाजून औकक्षण करून त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी भवरवाडी मध्ये नाथपंथी डवरी गोसावी समाजातील शिंदे व सावंत परिवाराचा शुभविवाह सोहळा होता.
       त्यावेळी मा.श्री.दिलीप खेडकर साहेब यांनी लोकसभा निवडणूक या विषयी भूमिका मांडली येणाऱ्या पुढील काळात तुम्ही मला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी भरगच्च मताने निवडून द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 
         तसेच वंचित बहुजन आघाडी व भटके विमुक्तांचे नेते *मा.श्री.ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव* म्हणाले कि भटके विमुक्त आदिवासी समाजातील सर्व लोकांची परिस्थिती काय आहे देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे झाले तरीपण भटके विमुक्तांचे व आदिवासींचे अठराविश्व दारिद्र्य आणखीन तसेच आहे कुठल्याच योजनेचा लाभ मिळत नाही. *येणाऱ्या पुढार्‍यांनी आमदारांनी,खासदारांनी आपला फक्त मतदाना पुरता वापर केला आहे.* आपल्या हक्काच्या कामाकडे दुर्लक्ष केले जाते.शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही,यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना देत नाही, नागरिकत्वाचे पुरावे, तसेच राहण्यासाठी घर कसून खाण्यासाठी गायरान जमीन कलाकार मानधन योजना,आधार कार्ड,रेशन कार्ड,जातीचा दाखला,याच्याकडे कोणी लक्ष देत नाही असे मनोगत व्यक्त केले.
      *येणाऱ्या 13 मे रोजी मा.श्री. दिलीप खेडकर साहेब* यांना भरगच्च मताने निवडून द्यावे अशी सर्व भटके विमुक्त आदिवासी  समाजातील कार्यकर्ते व माता-भगिनींना विनंती केली. तसेच वधू-वरांच्या हस्ते भटके विमुक्त आदिवासी,कोल्हाटी ,नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या हक्काचा व विकासाचा जाहीरनामा मा.श्री.दिलीप खेडकर साहेब यांना दिला आहे.
       यावेळी भटके विमुक्तांचे नेते भिमराव चव्हाण,अजिनाथ शिंदे, शंकर शेगर,सुभाष सावंत, सूर्यभान सावंत,मोहन सावंत, साहेबराव शिंदे,दत्ता सावंत,सुरेश शेगर,गोरख शिंदे,संतोष शिंदे, प्रकाश शेगर,तुकाराम पवार,राजू शेगर, धर्मा शिंदे,तानाजी सावंत,भगवान शेगर,दादा शेगर,तानाजी शेगर, साहेबराव चव्हाण, संतोष चौगुले , राजू शिंदे *मा.श्री.आतिश (दादा) पारवे* (वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष जामखेड) वैजिनाथ केसकर सर संतोष चव्हाण सर ऋषिकेश गायकवाड जाकीर तांबोळी इत्यादी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या