Ticker

6/recent/ticker-posts

रामटेक आढवळी बाजारात मोबाईल ' चोरांची हात की सफाई '

बाजारात गरर्दीचा फायदा घेवून करतात मोबाईल चोरी

सचिन चौरसिया चित्रा न्यूज 
 रामटेक ;- रामटेक नेहरु मैदान जवळ दर रविवारी आठवळी बाजार भरतो. या बाजारात येणांर्‍या ग्राहकांचे मोबाईल चोरीला जात असुन मोबाईल चोरांचा धुमाकुळ वाढत जात आहे. दर आठवळ्यात गर्दीचा फायदा घेत चार- पाच जणांचे हजारो रुपयांचे मोबाईल चोरीला जात आहे. त्यामुळे पोलीसांनी चोरांचा बंदोवस्त करावा अशी मागणी नागरीका कडुन होऊ लागली आहे. 
रामटेक येथील आठवळी बाजारात बाहेर गावातील शेतकरी ताजा भाजीपाला, व इतर वस्तु विक्री साठी आणतात. आठवळी बाजारात जवळपास गावातील व शहरातीत नागरीक ताजी व चांगली भाजी स्वस्त दरात मिळते म्हणून खरेदीसाठी येतात. बाजारात ग्राहक खरेदी करण्यात मग्र असलेले पाहुन चोर हा आपली हात की सफाई दाखवत खिशातुन ममोबाई लप्पास करतो. त्यामुळे सर्वसाधारण जनतेला चोरीचा त्रास व भुर्दड सहन करावा लागतोय. दिवसेनदिवस मोबाईल चोरांचा प्रमाण वाढत आहे. गर्दीचा फायदा घेत चोर बाजारांत चांगल्या व मोठ्या कंपणीचा मोबाईलवर हात साफ करतात. अश्या मोबाईल चोरांचा बंदोबस्त करण्यात यांवा. रोजच्या गुजरी व आठवळी बाजारात मोबाईल चोरट्यांवर योग्य कार्यवाही पोलीस प्रशासनांनी करण्यात यांवी अशी मागणी नागरीकांची करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या