Ticker

6/recent/ticker-posts

ब्राम्हण समाज समन्वय समिति तर्फे भगवान परशुराम जन्मोत्सवचे आयोजन


संजय देशमुख चित्रा न्युज 
छत्रपती संभाजीनगर :-दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्राह्मण समाज समन्वय समिति ब्राह्मण समाजाच्या वतीने शुक्रवार, दि. १० रोजी भगवान् श्री परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साह व आनंदमय वातावरणामध्ये साजरा करण्याचे नियोजन उत्सव समिती व समन्वय समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. विविध संघटना आणि वाद्य पथक पदाधिकारी हा उत्सव साजरा करण्यासाठी जय्यत तयारी करत आहेत

यंदा प्रथमच जन्मोत्सवाची सर्व प्रमुख जबाबदारी महिलांकडे सोपविण्यात आलेली आहे. यात जन्मोत्सव उत्सव समितीचे नियोजन अध्यक्ष व प्रकल्प प्रमुख म्हणून महिला संघटनप्रमुख ब्रह्मरागिणीच्या सौ गीता आचार्य व उत्तर देशीय सेवा समिती महिला आघाडीप्रमुख सौ विजया अवस्थी, बहुभाषिक ब्राह्मण समाजच्या सौ अनुराधा पुराणिक यांच्याकडे देण्यात आली आहे याशिवाय जवळपास ३५ सहभागी संघटनामधून प्रत्येकी एक महिला सदस्य ही उत्सव समितीमध्ये सहभागी आहे. सर्व प्रमुख कार्यक्रम व शोभायात्रा याचे नियोजन महिलांनीच अतिशय उत्तम प्रकारे केले आहे. त्यांना ब्राह्मण समाज समन्वय समिती आणि सर्व संघटना प्रमुख यांनी संपूर्ण पाठिंबा दिला असून सहकार्य करत आहात.

शुक्रवारी सकाळी औरंगपुरा येथील भगवान् परशुराम स्तंभ पूजन करण्यात येणार असून यात. चारही वेदाचार्य, सामाजिक, राजकीय, व्यावसायिक, उद्योग क्षेत्र आणि इतर समाजाचे प्रमुख व इतर मान्यवर यांना आमंत्रित करण्यात आले आहे याच वेळी वाहन रॅलीही काढण्यात येणार आहे.

सायंकाळी पाच वाजता भव्य शोभा यात्रा संस्थान गणपती येथून निघेल. यात प.पू. माई महाराज आणि बीड बायपास येथील रेणुका मंदीराचे अंबरीश महाराज सपत्नीक सहभागी होणार आहेत. शोभा यात्रेत चार ढोल पथकांचा सहभाग असेल. राजाबाजार, गांधी पुतळा, सराफ, मछली खडक गुलमंडी मार्गे औरंगपुऱ्यातील भगवान परशुराम चौक असा शोभायात्रेचे मार्ग असेल. 

ह्या वर्षी या महोत्सवानिमित्त दंत चिकित्सा शिबिर, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर, महिलांकरिता विविध स्पर्धा, यांचे आयोजन करण्यात आले होते. समर्पण ग्रुप माध्यमातून महिलाचे टर्फ क्रिकेट सामने पेनॉलटी कॉर्नर येथे पाच दिवस नियोजन घेण्यात आले. राजस्थानी विप्र समाजच्या वतीने समर्थनगर राम मंदीर येथे रक्तदान शिबिर आणि भगवान् परशुराम पूजन आदि विविध कार्यक्रम नियोजन करण्यात आलें आहे.

उत्सवाच्या सफल आयोजन करता ब्राह्मण समाज समन्वय समितीचे अध्यक्ष मिलिंद दामोदरे, मंगेश पळसकर, धनंजय पांडे सुरेश देशपांडे, संजय मांडे, आनंद तांदुळवाडीकर, माणिक रत्नपारखी, विनोद मांडे, अनिल खंडाळकर, रवींद्र, सुतवणे, जीवन जोशी, आर बी शर्मा, अतूल जोशी, निलेश सातोनकर, लक्ष्मीकांत जयपुरकर, मंदार देसाई, अभिषेक कादी, व्यवहारे, वैभव कुलकर्णी राहुल जोशी, सौ अनुराधा पुराणिक, सौ सायली पिल्ले, सौ धर्माधिकारी, सौ थेटे, माधुरी पुराणिक, आदित्य पिलदे, जगदीश एरंडे, सुधीर व्यास, अविनाश आडसकर, सतीश मंडपे, धीरज देशपांडे, अनिल मुळे, राजेंद्र शर्मा, सुरेश पारीख, सी एम शर्मा, धनंजय कुलकर्णी, अरविंद पाठक, सचिन अवस्थी, नरेश जोशी, जगदीश हरसुलकर, मार्तंड कौसडीकर, राहुल देशपांडे, सुनिल कौसडीकर यांच्यासह कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या