Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामस्थाकडुन महीला सैनिकांचा सत्कार


सचिन चौरसिया चित्रा न्युज


रामटेक:- भारत देशासाठी सेवा देणारे व शहीद होणारे अशी बातमी आपन ऐकतो व पाहतो. हीच गोष्ट मनात घेवून व जिद्द ठेवून रामटेक तातुक्यातील मौजा शिवनी भोंडकी या छोट्या गावातील कु.पल्लवी सदुजी मेहर हि भारतीय सैन्यात रुजु झाली. कु.पल्लवी सीमा सुरक्षा बल ची ट्रेनिंग पूर्ण करुण पहील्यांदा आपल्या जन्म गावी पाय ठेवताच ग्रामस्थांनी डिजे व फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करुण गावात तीची मिरवणूक काढुन सन्मानाने घरी आल्यानंतर स्वामी सितारामदास महाराज विद्यालय शिवनी भोंडकी येथील शिक्षकांनी पल्लवी व तिच्या आई- वडिलांचे शाल व ट्राफी देऊन सत्कार करण्यात आला ,या कार्यक्रमाला स्वामी सितारामदास महाराज विद्यालय शिवनी भोंडकी येथील मुख्याध्यापक पुडके सर, जेष्ठ शिक्षक क्षिरसागर सर, बंधाटे सर, जिझोते सर,बिनझोडे सर, पाटील सर,हुड बाबुजी, तसेच भंडारबोडी चे सरपंच मिसार मॅडम, महेंद्र दिवटे, लक्ष्मण शिवरकर, रमेश मिसार, शिवनी भोंडकी चे सरपंच विजय भुरे, उपसरपंच भोजराज धुवाधप्पार, पोलिस पाटील गणेश बडवाईक, तंटामुक्ती अध्यक्ष रामुजी मेहर,गेंदलाल कांतोडे, भारतजी बडवाईक, नरेंद्र भिवगडे, रामरतन मेहर, दामुजी गभणे, अमोल वैद्य, मेश्राम सर, तुलाराम गभणे, मनोज कांतोडे, रोहित शेंडे, अशोक आंबिलढुके, रामेश्वर मेहर, सदुभाऊ मेहर, बाबू मेहर, मधु मेहर सह अनेक शिवनी ग्रामवाशी महिला मंडळी व विद्यार्थी उपस्थित होते. कु. पल्लवी बोलतांना म्हटले की या सर्व यशाचे श्रेय माझे आई- वडील व माझ्या शाळेतील गुरु यांना दिले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या