Ticker

6/recent/ticker-posts

सर्व कलांमध्ये वक्तृत्व ही सर्वश्रेष्ठ कला आहे

 जि.प. सदस्या विद्या कुंभरे यांचे प्रतिपादन

 वक्तृत्व व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- चांगले जीवन जगण्यासाठी माणसाला अनेक कला अवगत कराव्या लागतात. माणसाकडे कला नसतील तर माणसाला मानसन्मान मिळत नाही. कला अनेक प्रकारच्या असल्यातरी सर्व कलेत वक्तृव कला ही सर्वश्रेष्ठ कला आहे. असे मत जिल्हा परिषद सदस्या विद्याताई कुंभरे यांनी मांडले. त्या गुरढा येथील वक्तृत्व व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेत उदघाटक म्हणून बोलत होत्या. यावेळी ओबीसी महिला प्रवर्गातून पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात प्रथम आलेली कुमारी निलेश बलवंत राघोर्ते हीचा सत्कार करण्यात आला. 
               मनोहर विद्यालय गुरढा येथे सात दिवसीय वक्तृत्व व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उदघाटन विद्याताई कुंभरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य योगराज मांडवटकर, प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून प्राचार्य छत्रपाल लामकाने तर प्रमुख अतिथी सरपंच किशोर घरट, सत्कार मूर्ती कु.निलेशा बलवंत राघोर्ते व कार्यशाळेचे आयोजक व प्रशिक्षक प्रा. उमेश सिंगनजुडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यशाळेची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीमाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून झाली. या कार्यशाळेत पोलीस उपनिरीक्षक या परीक्षेत ओबीसी महिला प्रवर्गातुन महाराष्ट्र राज्यातून प्रथम आलेली कु. निलेशा बलवंत राघोर्ते हिचा शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांनी वक्तृव कला व व्यक्तिमत्व विकासाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक प्राचार्य छत्रपाल लांमकाने म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी वक्तृत्व व्यक्तिमत्व विकास  कार्यशाळा आयोजित करणं गरजेचे आहे. सत्काराला उत्तर देतांना निलेशा राघोर्ते म्हणाली की स्पर्धेच्या युगात यशस्वी व्हायचे असेल तर ध्येयाला आपला श्वास की प्राण समजा. यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत केल्याशिवाय पर्यायच नाही. आज संपन्न झालेल्या उदघाट्नीय कार्यशाळा प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालन प्रा. उमेश रेहपाडे, प्रास्ताविक प्रा. उमेश सिंगनजुडे तर आभार सुभाष गरपडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिता जैस्वाल, शोभा अंडेल, तृप्ती मांढरे, नीलकंठ केरझरे, अमित बोरकर, सुजल मोहतुरे, भिवंम कांबळे, संचित डोंगरे यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमाला पालक आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या