Ticker

6/recent/ticker-posts

साहित्याच्या किमती वाढल्यामुळे घरकुल बांधकाम आवाक्याबाहेर

 घरकुलाच्या अनुदानात वाढ करावी, लाभार्थ्यांची मागणी 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा:- मागील ८ ते ९ वर्षापासून शासनाने घरकुल निधीत वाढ केली नाही. पण साहित्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे भविष्यात घरकुल बांधकाम दिवास्वप्न ठरणार असल्यामुळे घरकुलाचे निधीत दुपटीने वाढ करावी. अशी लाभार्थ्यांकडून मागणी होत आहे. 
                 मोडकळीस आलेल्या पडक्या घरात, मातीचे व कच्च्या घरात तसेच भाड्याचे(किरायाचे) घरात वास्तव्यास असणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील व अनुसूचित जातीच्या गरीब कुटुंबास रमाई आवास योजना, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यास शबरी आवास योजना, चालू आर्थिक वर्षापासून ओबिसी साठी मोदी आवास योजना तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती व कामगारांनाही घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे.  २०१५-१६ पासून घरकुलाची किंमत १ लाख ३० हजार होती व मजुरी पोटी १८ हजार ५०० रुपये अशी रक्कम ४ टप्प्यात लाभार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यावर जमा केली जाते. असे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. 
                 घरकुल बांधकामास लागणारे विटा, सिमेंट, लोहा, रेती व दारे, खिडक्या तसेच मजुरीच्या किमतीत सातत्याने वाढ होऊन शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे २७५ स्क्वेअर फूट जागेत घरकुल बांधकामास २.५० ते ३ लाख रुपये खर्च येतो. असे लाभार्थ्यांनी सांगितले. घरकुल लाभार्थी हा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने घरकुलाचे किमती एवढीच रक्कम स्वतः जवळून गुंतवू शकत नाही. त्यामुळे घरकुल बांधकाम लाभार्थ्यांचे आवाक्या बाहेर असल्यामुळे भविष्यात घरकुल म्हणजे दिवास्वप्न ठरणार आहे. शासनाने घरकुलाचे किंमतीत दुपटीने वाढ करावी. अशी लभर्थ्यांकडून मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या