• आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे यांचे प्रतिपादन
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्धाने गृहत्याग केला. त्यामुळे दुःखाचे मूळ कारण शोधून दुःख निवारणाचा मार्ग सापडला. सर्वप्रथम बुद्धाची शिकवण अंगीकार केल्यास मानवी जीवनात पंचशीलाचे आचरणातून मानवाचे केल्याने शक्य असल्याचे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत प्रा.डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी केले. ते त्रिरत्न बुद्ध विहार भीमनगर कन्हाळगाव येथे तथागत गौतम बुद्ध जयंतीनिमित्त आयोजित महोत्सव व स्नेहमिलन कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना आपले विचार व्यक्त केले.
त्रिरत्न बुद्ध विहार कन्हाळगाव भीम नगर दीक्षा भूमी परिसरात गुरुवार(ता.२३मे) रोजी जगाला करुणा व शांतीचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे जयंती महोत्सव व स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८:०० वाजता ध्वजारोहण, ८:०५ सामूहिक बुद्ध वंदना, ८:२० धम्म रॅली, ८:३५ राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांचे पुतळ्याचे स्वागत व राष्ट्रगीत, ८:५० डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती बुद्ध विहार कन्हाळगाव येथे ध्वजारोहण, ९:१५ रॅलीचा समारोप, ९:२० विद्यार्थी व ग्रामस्थांच्या भीम बुद्ध गीत, रांगोळी स्पर्धा व मान्यवरांचे मार्गदर्शन, १२:०० वाजता अल्पोपहार व पारितोषिक वितरण त्यानंतर सायंकाळी ५:०० वाजता मुख्य कार्यक्रमास सुरू करण्यात आली. उद्घाटक बहुजन ललकार चंद्रपूर चे संपादक डी.के. आरिकर, अध्यक्षस्थानी संचालक व सेवानिवृत्त प्राचार्य सुरेश भोवते, प्रमुख अतिथी आंबेडकरी विचारवंत प्रा.डॉ. सुरेश खोब्रागडे, प्रा.डॉ. रेवाराम खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ता डॉ. युवराज मोटघरे, धनराज मेश्राम, पंचायत समिती सदस्य रवींद्र(दादू) खोब्रागडे, सरपंच समिर मस्के, सामाजिक कार्यकर्ता चुंन्नीलाल भोवते, डॉ. इचींद्र मस्के, लोमेश्वर हूमे, पोलिस हवालदार हेमराज मेश्राम, पोलिस पाटील रोशनी भोवते तथा सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण, मेनबत्ती व अगरबत्ती प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले व कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. जगातील अनेक राष्ट्र बुद्धाच्या मार्गाने वाटचाल करून आजही ते आपल्या पुढे आहेत. असे उद्घाटक डी.के. आरीकर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले. तर प्रमुख अतिथी रेवाराम खोब्रागडे यांनी तथागत गौतम बुद्धांना याच दिवशी वैशाख पौर्णिमेला जन्म, ज्ञानप्राप्ती आणि निर्वाण झाल्याचे सांगितले. उपस्थित मान्यवरांनीही तथागत गौतम बुद्ध यांचे जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश भोवते, प्रास्ताविक नेपाल भोवते यांनी तर आभार देवराम खोब्रागडे यांनी मानले. रात्री मनोरंजनपर आयुष्यमान नेपाल बाळाजी भोवते आणि संच औरंगाबाद यांच्या प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कन्हाळगाव आणि परिसरातील उपासक, उपासिकांनी बहुसंख्येने कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.


0 टिप्पण्या