Ticker

6/recent/ticker-posts

सुर्यलक्ष्मी सुतगिरणीस भिषण आग : १५ कोटीचे नुकसान


सचिन चौरसिया चित्रा न्युज
रामटेक:- नगरधन (ता. रामटेक) स्थित सुर्यलक्ष्मी सुतगिरणीला शाँर्टसर्किने आग लागल्यामुळे तायार माल, मशीनी, ईलेक्ट्रिक साहित्य, बिल्डिंग असे अंदाजे १५ कोटीचे नुकसान झाले. गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
नगरधन येथील सुर्यलक्ष्मी सुतगिरणीत जिंनिग विभागात कामगार नेहमीप्रमाणे काम करीत होते, रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक शाँर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली. जिनिंग विभागात कापुस असल्यामुळे आगीनी चोर पकडला. आग लागताच कामगार आपला जिव वाचविण्यासाठी जिनिंग विभागालुन बाहेर धाव घेत होते. आगेने हळू-हळु समोर वाढत ती फिनिशींग विभागात पसरत गेली. फिनिशींग विभागात तयार माल असल्यामुळे आगीने पाहता -पाहता अल्पावधीत रौद्र रुप धारण केले. या घटनेची माहीती मिळताच कंपनीचे प्रबंधक यांनी तातळीने घटनास्थळी धाव घेत आग लागल्याची माहीती अग्निशामक दलाला देण्पात आली. अग्निशमक दल घटनास्थळी पोहचत पर्यत सुतगिरणीच्पा विभागाचे मोठे नुकसान झाले होते. अग्निशमक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला असता मात्र आगीन रौद्ररुप धारण केले. पाण्याच्या फवारा सतत चालु असतानाही आग आटोक्यात येत नव्हती.  आगीच्या ज्वाळा व धुर आकिशात पसरला होत्या. तिन ते चार किलोमीटर अंतरावरुण आकाशात धुर दिसुन येत होता. आगित सुतगिरणीच्या विभागातील तयार माल ,मशीन, सुत, छतावरील पंत्रे, आगीत जळुन खाक झाले. यामध्ये कोणत्याही कामगारांची जिवेहानी झाली नाही. अंदाजे सुतगिरणीचे १५ कोटीचे नुकसान झाले असावे असे सुतगिरनिच्या प्रबंधकाने सांगितले. रात्री उशिरापर्यत आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमक दलाचे जवान प्रयत्न करीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या