मोईन कादरी हिंगोली
हिंगोली :-दिनांक 07/05/2024 रोजी पो. स्टे.हिंगोली शहर हद्दीत हळद मार्केट परिसरात फिर्यादी नामे दीपक विजय शेळके राहणार घोटा देवी यांची होंडा शाईन मोटार सायकल चोरी संदर्भाने गुरण 298/24 कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल होता. मोसा चोरीचा गुन्हा उघड करण्यासंदर्भाने पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस विकास पाटील यांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत होते.
दिनांक 9/ 5/ 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की हळद मार्केट परिसरातून होंडा शाईन मोटार सायकल चोरलेला आरोपी नामे धम्मपाल शेषराव सोनुने वय 25 वर्षे राहणार सिद्धार्थ नगर हिंगोली हा मोटार सायकल चोरला असून तो सध्या सिद्धार्थ नगर परिसरात चोरीच्या मोटार सायकल विक्री करण्यासाठी फिरत आहे अशी माहिती मिळाल्यावरून आणि गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी धम्मपाल सोनवणे या ताब्यात घेऊन विचारपूस केली असता प्रथमता आरोपीने मोटारसायकल वरील मूळ नंबर प्लेट काढल्यामुळे उडवा उडवी चे उत्तर देत होता, आरोपीस अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने हळद मार्केट परिसरातून दोन दिवसापूर्वी मोटरसायकल चोरल्याचे सांगितले व गुन्हा कबूल केला , त्यावरून पोलीस पथकाने चोरलेली मोटरसायकल एम एच 38 AB 8804 होंडा शाइन 50,000/- रु.चा मुद्देमाल जप्त करून आरोपी व मोटार सायकल पो.स्टे.हिंगोली शहर येथे हजर करुन गुन्हा उघड केला आहे.
आरोपीकडून अधिक मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थागुशा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार लिंबाजी वाव्हळे, किशोर सावंत, महादू शिंदे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.


0 टिप्पण्या