Ticker

6/recent/ticker-posts

बौद्ध धम्म जगाची पुनर्रचना करणारा धम्म आहे - प्रा.डॉ. सुरेश खोब्रागडे


संजीव भांबोरे भंडारा 
भंडारा :- बुध्दाचा धम्म हा शांतीचा व नितीचा धम्म आहे. विश्वाला तारणारा धम्म आहे. हा धम्म जगाचा  पुनर्जन्म करणारा नाही, तर पुनर्रचना करणारा आहे. प्राचीन बौद्ध धर्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेला बुध्दाचा धम्म यात फरक आहे. पारंपरिक बौद्ध धर्म बोधिप्राप्ती करणे हे ध्येय मानत होता. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध हे जग बदलण्याची ते अधिक चांगले करण्याची भाषा करीत आहे. आणि म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्म जगाची पुनर्रचना करणारा धम्म आहे. असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी स्मारक भूमी साकोली येथे केले. ते बो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समितीच्या बुद्ध जयंती कार्यक्रमात बोलत होते.
             तालुका स्मारक समितीच्या वतीने आयोजित बुद्ध जयंती निमित्त दीपक साखरे अध्यक्ष स्मारक समिती यांचे हस्ते सकाळी 9.00 वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण  झाले. त्यानंतर धम्मध्वज गाथा व बुद्ध वंदना झाली.बुद्ध जयंती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समितीचे अध्यक्ष दीपक साखरे यांनी भूषविले. समितीचे सचिव ऍड. स्मिता मेश्राम यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन समितीचे उपाध्यक्ष अशोक रंगारी यांनी केले. तर आभार कविता मडामे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वाना अल्पोपहार  व खीर देण्यात आली. कार्यक्रमा च्या यशस्वीतेसाठी समितीचे सदस्य अरविंद राऊत, विजय साखरे, प्रसेंजित राऊत, परसराम बोदेले, नालंदा टेम्भूर्णे, , प्रमोद शिगाडे, सल्लागार समितीचे बलराज राऊत, मनोहर कोचे, वसंता मेश्राम, भरत दिरबुडे, बी. बी. राऊत, ऋषी रंगारी, किशोर राऊत, प्रतिमा राऊत, ममता रंगारी, दिवाकर रामटेके,सुरेश राऊत, नित्यानंद मेश्राम, अमोल टेम्भूर्णे, सोनु राऊत, नंदू राऊत, डि जी रंगारी, यांनी परिश्रम घेतले.  कार्यक्रम प्रसंगी बहुसंख्येने बौद्ध महिला व पुरुष उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या