विठ्ठल पाटील लातूर
लातूर :-घरातच आजोबा-पंजोबा पासुन ते 2 चुलते यांच्या पासुन चालत आलेला समाजकारणाचा वारसा सांभाळणारे आणि ग्रा.पं.च्या सत्तेच्चा माध्यमातुन राजकारणापेक्षा ग्राम विकासाचा वसा घेतलेले उपसरपंच बालाजी भो. पाटील यांनी स्वत:चा वाडा असलेले वार्ड 2 मधील सर्वांच्या जिव्हाळ्याचा असलेला व सतत होणारा विजेचा लपंडाव दुर व्हावा,आणी सुरळीतपणे विजपुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.तसेच या वार्डात कांहीच्या घरातील साहित्यामुळे गत 5 / 6 महिण्यापासुन गटारी तुंबल्याने घाण पाणी रोडवरुन वाहत जाते.व अनेकांच्या दारापुढे थांबते.म्हणुन या सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे असलेले प्रश्न,समस्या पावसाळ्यापुर्वी सोडवाव्यात.अशी अपेक्षा वार्ड नंबर 2 जुनीबाजार गल्लीतील जनतेची आहे.आणी गावचा आश्वासक आणी विकासाचा चेहरा बनलेले उपसरपंच स्वत:च्या गल्लीतील विजेची आणि तुंबविलेल्या गटारीची समस्या येत्या पावसाळ्यापुर्वी नक्कीच सोडवतील. अशी खाञी वार्डातील जनतेला आहे.
स्व.रामराव पाटील,स्व.बापुसाहेब पाटील,स्व.नारायणराव पाटील या आजोबा व पंजोबा पासुन ते माजी सरपंच शिवाजीराव पाटील व स्व. अनंतराव पाटील या चुलत्यापासुन समाजकारणाचा परंपरागत वारसा उपसरपंच बालाजी पाटील हे सर्मथ - पणे चालविताना दिसतात.व ग्रा.पं. सत्तेच्या माध्यमातुन गावात विकास करुन कामाची "बुलेट ट्रेन" गलो - गल्ली पळताना दिसत असल्याने हंडरगुळी ग्रामस्थांचा आश्वासक चेहरा बनलेले उपसरपंच बालाजी पाटील यांचेकडून या वार्डातील विजे चा लपंडाव तसेच कोंडवलेल्या गटारी या खुप जुन्या असलेल्या समस्यांची सोडवणुक ते करतील.याची खाञी या बाजार गल्लीतील जनतेला वाटते.


0 टिप्पण्या