किरण जावळे चित्रा न्युज
बीड/आष्टी-महाविकास आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या प्रचारार्थ सोमवार दिनांक ६ मे रोजी सकाळी ११ वाजता आष्टी येथील ईदगाह मैदान येथे मा शरदचंद्रजी पवार साहेब यांची जाहीर सभा होणार असून सर्वांनी या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आम आदमी संघटनमंत्री प्रदिप भैय्या थोरवे यांनी केले आहे.
बीड लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग (बप्पा) सोनवणे यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला असून सर्व सामान्य नागरिकांचा त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. सदरील निवडणूक ही जनतेने हातात घेतली असल्याने बजरंग सोनवणे यांचा विजय निश्चित झाला आहे.त्यामुळे आष्टी मतदार संघाचा विकास करण्यासाठी बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब ,भूषणसिंह राजे होळकर यांची आष्टी येथे सोमवारी सकाळी ११ वाजता जाहीर सभा होणार आहे.या सभेस उपस्थित. महेबूब शेख,आ.संदीप क्षीरसागर. जीवनराव गोरे. मा.आ सय्यद सलीम. मा आ साहेबराव दरेकर,,मा आ उषा दराडे, मा आ पुर्थ्वीराज साठे,मा आ बदामराव पंडित, मा आ राजेंद्र जगताप, सुशीला मोराळे,बबन गिते, शिवसेना जिल्हाप्रमुख (उबाठा), परमेश्वर सातपुते, आष्टी विधानसभा राम खाडे, अण्णासाहेब चौधरी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, काॅग्रेस तालकाध्यक्ष रवि ढोबळे, मिलींद आव्हाड मानव हक्क अभियान चे राष्ट्रीय अध्यक्ष,ॲाल इंडीया पॅंथर दिपक भाई केदार ,डेमोक्ट्रीक पार्टी चे प्रदेश अध्यक्ष अजिंक्य चांगणे,अहमद पठाण ॲड.किशोर मुळे, सुनील नाथ, अमोल तरटे, आप चे अशोक येडे, ऑल इंडिया पँथर जिल्हा अध्यक्ष उपस्थित राहणार आहे. तसेच आष्टी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रदिप भैय्या थोरवे यांनी केले आहे.


0 टिप्पण्या