Ticker

6/recent/ticker-posts

ठेकेदाराच्या अनास्थेमुळे दलित वस्तीची मंजूर कामे रखडली...

सुजित धनवे चित्रा न्युज 

अहमदनगर :- जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा व परिसरातील निवडणुकीच्या अगोदर मंजूर झालेल्या कामांना अद्याप पर्यंत ठेकेदाराच्या अनास्थेमुळे कामे सुरू करता आलेले नाही .निविदा प्रक्रिया घेताना आपल्याला च काम कसे मिळेल या चढा ओढीतून निविदा रक्कम कमी टाकून काम मिळविले जाते. नाही परवडले तर ठेकेदार मुद्दाम काम बंद ठेवतो अथवा सोडून देतो.असाच प्रकार जामखेड तालुक्यातील रस्त्यांच्या कामाबाबत घडला होता .तरी अर्धवट काम सोडणाऱ्या, कामास विलंब लावून वेळेत पूर्ण काम न करणाऱ्या संस्था व ठेकेदारावर कठोर कारवाई करून त्यांना का यादीत टाकावे अशी मागणी आता सर्वसामान्य जनतेतून होत आहे.  जामखेड तालुक्यातील एक कोटी नऊ लक्ष रुपयाच्या दलित वस्तीतील मंजूर कामांना अद्यापही मुहूर्त मिळालेला दिसत नाही. 
        याबाबत जामखेड सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुतार यांनी सांगितले होते की, निवडणुकीपूर्वी सदरील कामे सुरू होतील परंतु, ठेकेदाराने पाणीटंचाईचे कारण देत व आचारसंहितेच्या नावाखाली काम सुरू केले नाही. यामध्ये खर्डा येथील मातंग वस्ती मधील सामाजिक भवन बांधणे, तसेच ग्रामीण हद्दीतील धोंडपारगाव येथे दलित वस्ती मध्ये बौद्ध विहार बांधणे, जवळा येथे दलित वस्ती मध्ये सामाजिक भवन बांधणे, शिवूर गाव तालुका जामखेड येथे दलित वस्तीमध्ये सामाजिक भवन बांधणे, साकत गाव तालुका जामखेड येथे सामाजिक भवन बांधणे, पाटोदा गाव तालुका जामखेड येथे सामाजिक भवन बांधणे अशा सहा एकत्रित कामाचा एक कोटी नव लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला. या कामाचे टेंडर दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी काढण्यात आले होते. सदरील कामाचे वर्क ऑर्डर( कार्यारंभ आदेश)  ही काढण्यात आली होती. मात्र पाच महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप पर्यंत या ठेकेदाराने सदरील कामे सुरू केलेली नाहीत. त्यामुळे नागरिकात संताप व्यक्त होत आहे. तसेच खर्ड्याजवळील मोहरी येथील जगदंबा देवी मंदिर या ठिकाणी भाविकांसाठी प्रवेशद्वार बांधणे, पाण्याची टाकी, सभामंडप, पुरुष व महिलांसाठी स्वच्छतागृह बांधणे, परिसरात काँक्रिटीकरण व मुख्य रस्त्याचे काम करणे या कामासाठीही एक कोटी सहा लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाले असून हे काम चालू असल्याचे समजते.
     प्रतिक्रिया
 ही दोन्ही कामे विधान परिषदेचे आमदार प्रा.राम शिंदे यांच्या निधीतून  मंजूर झाले असून दलित वस्तीचे काम ही लवकरच सुरू होईल असे भाजपा चे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र सुरवसे यांनी सांगितले.   
       खर्डा व परिसरात मंजूर असलेली कामे पावसाळ्यापूर्वी सुरू करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे . प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराचा फटका मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळेच दलित वस्तीच्या नागरी सोयी सुविधा पासून जनता वंचित राहताना दिसत आहे.
प्रतिक्रिया...
दलीत वस्तीचे कामासंदर्भात टेंडर प्रक्रिया व कार्यारंभ आदेश दोन्ही ची पूर्तता झाली असून संबंधित ठेकेदाराला त्वरित काम सुरू करणेबाबत कळविले जाईल.
       शशिकांत सुतार 
 उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जामखेड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या