Ticker

6/recent/ticker-posts

हत्तीरुग्णांची वैद्यकीय तपासणी करून दिव्यांग प्रमाणपत्र वाटप शिबिर

रुपाली मेश्राम चित्रा न्युज 
अमरावती - जिल्हा हिवताप व हत्तीरोग कार्यालय अमरावती मार्फत जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे अमरावती जिल्ह्यातील 15 हत्तीरुग्णांची ग्रेडनिहाय तपासणी करून दिव्यांग प्रमाणपत्र वाटप सुरुवात करण्यात आले. तसेच हत्तीरुग्णांसाठी विशेष चप्पल वाटप करण्यात आले.
      या सर्व हत्तीरुग्णांची तपासणी डॉ.संतोष राऊत, डॉ.रवी भूषण, डॉ.माया पवार यांनी केली व समुपदेशन अश्विनी म्हेसणे, श्री.श्रीभक्ते यांनी केलं.
      हे शिबिर मा.उपसंचालक डॉ.भंडारी सर, मा.सहायक संचालक डॉ.जोगी मॅडम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सौंदळे सर, मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.असोले सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.
          या शिबिरात हत्तीरुग्णांना सखोल मार्गदर्शन व आरोग्य शिक्षण जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.शरद जोगी सर यांनी दिले. यावेळी हत्तीरोग अधिकारी श्री.दिनेश भगत सर, डॉ.जुनेद सर उपस्थित होते. 
            या सर्व शिबिराचे नियोजन आरोग्य कर्मचारी श्री.प्रकाश दातीर, श्री.अशोक राठोड यांनी केले.
       राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण उपपथकातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेऊन रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी कष्ट घेतले त्यामध्ये आरोग्य निरीक्षक श्री.पी.एल.भावेकर, श्री.आर.टी.दुधकवरे, श्री.एम.जी.मोने, श्री.एम.एस.तायडे, श्री.भोजराज माहोरे, आरोग्य कर्मचारी श्री.जी.जी.भोयर, श्री.नितीन बरडे, श्री.ए.आर.शेंडे, श्री.किशोर बकाले, श्री.राहुल भोसले, नियमित क्षेत्र कर्मचारी श्री.ए.डी.दुधिवार, श्री.एच.आर.इंगळे, श्री.डी.ए.वानखडे,श्री.आर.डी.सोनुले, श्री.जी.एन.मळसने, श्री.एच.पी.कदम, श्री.पी.के.चव्हाण,श्री.भूषण वट्ठे हे होते.
         कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.प्रकाश दातीर यांनी केले व आभार श्री.अशोक राठोड यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या