Ticker

6/recent/ticker-posts

गरिबांना मिळेना रेती आणि तस्करलोकांना नाही कुणाची भीती .. हाळीहंडरगुळी भागात अवैध रेतीचा दिसतोय स्टाॅक


 विठ्ठल पाटील चित्रा न्युज

 लातूर :-तहसील कार्यालय,उदगीर मधील महसुल विभागाच्या आर्शिवादाने शासन नियम ढाब्यावर बसवुन
हाळी मार्गे ट्रक व ट्रॅक्टरला ताडपञी झाकुन वाळूची ओव्हरलोड वाहतूक होत असल्याचे व या भागात जागो
जागी वाळूचे ढिगारे जमा केल्याचे दिसुन येत आहे.तसेच चाकुर आणि अहमदपुरचे आयपीएस.अधिकारी बडेली चंद्रकांत रेड्डी व नवदीप अगर-वाल यांनी अवैध रेती वाहतूक करित असलेले वाहने कांही दिवसापुर्वी शिरुर ताजबंद ते उदगीर रोडवर जप्त केले होते.पण उदगीर तहसीलच्या सं.अधिका-यानी आजवर टोपलभरही अवैध वाळू पकडल्याचे आठवत नाही.ट्रॅक्टरसह मोठमोठ्या हायवा या वाहनांतुन या मार्गे ओव्हरलोड आणी ताडपञी झाकुन वाळूची अवैभरित्या वाहतूक होताना सामान्य जनतेला दिसत आहे.माञ तहसीलदारासह संबंधित महसुल अधिका-याला रेती ची होणारी अवैध वाहतूक दिसत का व कशी नाही.हाळी-हंडरगुळीत व तसेच यामार्गे उदगीर व परिसरातील अनेक गावात ताडपञी झाकलेल्या ट्रक व हायवातुन वाळूची ओव्हरलोड
वाहतूक राञंदिवस होत असुन,रेती तस्करांना कोणाचीच भिती वाटत नाही.कारण महसुल अधिकारी या प्रकाराकडे व रेती तस्करांकडे एखादा मुकदर्शक बघावा अशा प्रकारे बघत असतात.म्हणुनच अवैध वाळूवाहतूक
करणारी वाहने सुसाट पळतात.अशी चर्चा जाणकारात होत आहे.तस्कर लोकांना कुणाचीच भिती वाटत नाही
म्हणुनच या भागात अवैध रेतीची वाहतूक व ढिगारे गावोगावी मोठ्या प्रमाणात दिसतात.आणि शासन नियमांना हरताळ फासुन व महसूल अधिका-यांसह आपले खिसे रेती तस्कर गरम करतात.असा सुर हाळी
व परिसरातील जाणकार काढतात  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या