विठ्ठल पाटील लातूर
लातूर :-उदगीर आंन्ध्रप्रदेश,कर्नाटक,तेलंगणा या 3
परराज्यासह महाराष्ट्रातील हजारो दररोज ये-जा करतात.त्या उदगीरच्या बसस्थानकाचे पाडकाम होऊन एक,दोन वर्षे झाले.तरीही नविन बांधकाम स्पीडने होण्याऐवजी अति स्लो होत असल्याने प्रवाशांना नानाविध प्रकारे ञास सहन करित बसची वाट बघत ताटकळत थांबावे लागते.तसेच सध्या पडत असलेल्या अवकाळी पावसाचे पाणी स्टॅंन्डच्या मैदानात असलेल्या शेकडो लहान-मोठ्या खड्ड्यांमध्ये साचत असल्याने या साचलेल्या घाण पाण्याच्या दलदलीतुन "पायधुनी"
करुनच प्रवाशांना बस मध्ये चढावे व उतरावे लागत असल्याचे महान चिञ उदगीरच्या बस स्थानकात दिसत
आहे.माञ मंञी महोदय व एस.टी.चे अधिकारी या महाशयांना दिसत कसे नाही.याचे नवल वाटत आहे.तसेच सध्या पडणा-या अवकाळी पावसाने
स्थानक परिसराची ही हालत आहे.तर मग आगामी पावसाळ्यात स्टॅंन्ड परिसराची अवस्था कशी असेल.या
बाबीचा विचार करणार कोण.सध्या या बस स्थानकात प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.यात प्रवाशी संख्येचा व आगामी. पावसाळ्याचा विचार करता येथे येणारे प्रवाशी भिजणार नाहीत.याची
दक्षता घेऊन सुरक्षित बैठक रुम बांधणे गरजेचे आहे.तसेच पडलेले खड्डे बुजविणे व बसेसचा थांबा फिक्स करणे ही गरजेचे आहे.कारण अहमदपुर जाणा-या लोकल गाड्या या कधी फ्लॅाट क्र.1 पुढे तर कधी
रसवंती सेंटर पुढे थांबतात.यामुळे जेष्ठ व अपंग तसेच महिला प्रवाशांची मोठी पळापळ होत असते.या संपुर्ण प्रकाराचा तसेच दलदलीत पायधुनी करुन बस मध्ये व बाहेर जाणा-या प्रवाशांच्या विशेषत: महिला प्रवाशी यांच्या मानसिकतेचा वरिष्ठांनी त्वरीत विचार करावा,आणि उदगीरच्या एस.टी.बस स्थानकातील गैरसोय,दुर्घंधी दुर करावी.अशी प्रवाशांतुन बोलले जात आहे.


0 टिप्पण्या