Ticker

6/recent/ticker-posts

बीड बायपासवर चोवीस तासांत दोन महिलांची सोनसाखळी नेली हिसकावून

राकेश आसोले चित्रा न्युज 
बीड :-गेल्या चोवीस तासांत बीडबायपासवर सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन महिलांच्या सोनसाखळी हिसकावून नेण्यात आल्या. यातील पहिली घटना बुधवारी, दि. २२ रोजी सकाळी ७ वाजता जैन इंटरनॅशनल शाळेजवळ घडली. तर दुसरी घटना गुरुवारी सकाळी ८ वाजता चौधरी इस्टेटजवळ ७५ वर्षीय वृद्धेसोबत घडली.

प्रणिता कुलकर्णी (५९) या रोज सकाळी नियमित मॉर्निंग वॉक करतात. २२ मेरोजी सकाळी ६:४५ वाजता जैन इंटरनॅशनल शाळेजवळून त्या पायी जात असताना त्यांच्या मागून दुचाकीस्वार आले. त्यांच्याजवळ जाऊन वेग कमी करत मागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे गंठण हिसकावून तोडले व सुसाट वेगात पोबारा केला. कुलकर्णी यांनी आरडाओरड केली. नागरिक गोळा होईपर्यंत मात्र चोर दूरपर्यंत गेले होते. 

बीडबायपासवरच चोवीस तासांत सोनसाखळी चोरीची दुसरी घटना घडली. चौधरी इस्टेटमध्ये राहणाऱ्या रमा शशिकांत वाघ (७५) या गुरुवारी सकाळी ८ वाजता परिसरात पायी फिरत होत्या. यावेळी दुचाकीवर सुसाट येत चोरांनी त्यांच्या गळ्यातील ३ तोळ्यांची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. दोन्ही घटनेप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या